21 November 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Post Office Vs FD | पैसे कुठे गुंतवावे? पोस्ट ऑफिस योजना की बँक FD मध्ये? फायदा कुठे जाणून घ्या

Post Office Vs FD

Post Office Vs FD | कोणत्याही स्कीमचा लाभ घेण्याआधी अनेक गुंतवणूकदार व्याजाची रक्कम पाहून स्कीम फॉलो करतात. कारण की व्याजाची रक्कम जेवढी जास्त असेल तेवढेच जास्त पैसे मॅच्युरिटी पिरियडनंतर आपल्याला मिळतात. परंतु असं नसून स्कीमच्या कॅल्क्युलेशन वर देखील डिपेंड करतं.

NSC पोस्ट ऑफिसच्या एनएससी म्हणजेच नॅशनल सेविंग स्कीममध्ये 7.7 टक्के एवढा व्याजदर पाहायला मिळतो. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 7.5 टक्क्यांनी व्याजदर असतो. परंतु व्याजदर कमी असून सुद्धा पोस्ट ऑफिस एफडी मधूनच लाभार्थ्याला जास्त पैसे मिळू शकतात. म्हणूनच कोणत्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी व्याजदर नाही तर, संपूर्ण कॅल्क्युलेशन चेक करा. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि एनएससीचं कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

कमी व्याजदरात जास्त पैसे मिळवून देणाऱ्या अनेक स्कीम उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तिचं कॅल्क्युलेशन सिम्पल इंटरेस्टवर आहे की कंपाऊंड इंटरेस्टवर आहे हे माहीत करून घेणे अत्यंत गरजेचं आहे.

एखाद्या स्कीममध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागत असेल तर, कॅल्क्युलेशन एका वर्षापर्यंत मर्यादित आहे की तीन महिन्यांच्या आधारावर लावलं जात आहे या गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

जर स्कीममधील व्याजाला कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये कॅल्क्युलेट करत असतील तर, मिळणाऱ्या व्याजावर आणखीन व्याज मिळत जातं.

पोस्ट ऑफिस एनएससी कॅल्क्युलेशन :
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग स्कीमवर पाच वर्षांच्या कालावधीमध्ये 7.7 टक्क्यांनी व्याज लागते. एनएससीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एफडीच्या रक्कमीपेक्षा जास्त असते. परंतु यामध्ये मॅच्युरिटी नंतर फार कमी पैसे हातामधे येतात. जर तुम्ही एनएससीवर एक लाख रुपयांपर्यंत इन्वेस्ट केलं असेल तर, तुम्हाला 7.7 टक्क्यांच्या हिशोबाने वर्षाचे 7,700 रुपये मिळतात. दुसऱ्यावर्षी 1,07,700 रुपयांवर 7.7 टक्के व्याजदर मिळतो. त्यानंतर मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 1,44,903 एवढी रक्कम मिळते. म्हणजेच सामान्य व्याज किंवा जास्त व्याज असलं तरीसुद्धा एफडीमध्येचं फायदा जाणवतो.

पोस्ट ऑफिस एफडी कॅल्क्युलेशन :
पोस्ट ऑफिस एफडी कॅल्क्युलेशनमध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळावर 7.5 टक्के व्याजदर दिलं जातं. 7.5 टक्के व्याजदराने तीन महिन्यांच्या आधारावर पाहिलं तर, एकाच वर्षातून तब्बल चार वेळा कॅल्क्युलेशन होतं. म्हणजेच 7.5/4=1.875% व्याज प्रत्येकी तीन महिन्यांनी जमा झालेल्या रकमेवर लावलं जातं. जर तुम्ही एक लाख रुपये इन्वेस्ट केले असतील तर, 1 लाखावर 1.875% व्याज लागलं जाणार. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 1,01,875 लाख रुपये एवढी रक्कम जमा होणार. असं प्रत्येक तीन महिन्यांनी 1.875% व्याज लागत जातं. तेव्हा पाच वर्षांमध्ये तुम्हाला 1,44,995 रुपये मिळणार.

News Title : Post Office Vs FD Benefits need to know check details 02 September 2024.

हॅशटॅग्स

#Post Office Vs FD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x