23 November 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन नको! ही सरकारी योजना महिना 9,250 रूपये देईल; नक्की फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | सरकारने पोस्ट ऑफिसमार्फत अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. चांगली गोष्ट म्हणजे बँकांच्या व्याजदरापेक्षा पोस्टाचे व्याजदर देखील उत्तम आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्टाच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत. दरम्यान पोस्टाची ‘मंथली इनकम स्कीम’ तुम्हाला माहित आहे का? या स्कीममुळे तुम्हाला दर महिन्याला घरबसल्या एका पगाराएवढी रक्कम मिळू शकेल.

मंथली इनकम स्कीममध्ये सलग पाच वर्ष पैसे गुंतवल्यास त्याचा चांगला मोबदला तुम्हाला मिळणार आहे. फक्त पाच वर्ष इन्व्हेस्ट करून प्रत्येक महिन्याला नऊ ते दहा हजार पगार मिळवायचा असेल तर, पोस्टाकडून या मंथली इनकम स्कीमविषयी अधिक जाणून घ्या.

हि स्कीम भारत सरकारची असून, पोस्टमार्फत चालवली जात आहे. या स्कीमच्या नियमाप्रमाणे तुम्ही फक्त पाच वर्ष खात्यामध्ये पैसे गुंतवू शकता. या खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी हजार आणि जास्तीत जास्त हजाराच्या पटीतील रक्कम गुंतवली पाहिजे. जर तुम्ही स्वतंत्र अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्ही नऊ लाखांपर्यंत अमाऊंट गुंतवू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केलं असेल तर 15 लाखापर्यंत पैसे गुंतवू शकता. गुंतवलेला पैशांवर सरकार तुम्हाला दरवर्षी 7.4 टक्क्यांनी व्याज देते. दरम्यान मॅच्युरिटी पिरेड पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही अमाऊंट काढून घेतली तर, तुमची एक टक्के रक्कम कापून घेतली जाते.

स्वतंत्र खात्यामध्ये 7.4 टक्क्यांनी नऊ लाखांपर्यंत पैसे गुंतवल्यास प्रत्येकी महिना 5500 तर, जॉईंट अकाउंट खातेधारकांना पंधरा लाखांच्या गुंतवणुकीवर 9250 एवढे रुपये मिळू शकतात. या योजनेमध्ये एक, दोन ज्येष्ठ म्हणजेच संयुक्त अकाउंट आणि तीन ज्येष्ठ व्यक्ती देखील संयुक्त अकाउंट ओपन करू शकतात. विशेष म्हणजे दहा वर्षीय अल्पवयीन मुलांचे देखील अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं.

या अकाउंटमध्ये 15 लाखांपर्यंत पैसे गुंतवल्यास संयुक्त खात्यातील व्यक्तींना भागीदारीमध्ये समान वाटा मिळणार. त्याचबरोबर खातेदाराने प्रत्येक महिन्याला व्याजावर दावा दाखवला नाही तर त्याला अधिक व्याज मिळणार नाही. असं पोस्टाने सांगितलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक महिन्याला पगारा एवढी रक्कम मिळवत राहा.

Latest Marathi News | Post Office Scheme MIS 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x