22 November 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Post Office Scheme | मुलींसाठी खास फायद्याची योजना; फक्त रु.250 बचतीवर मिळतील 2 लाख 77 हजार रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस मार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत सर्वांचा समावेश केला जातो. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती योजनेचा उपभोग घेण्यासाठी पात्र असते. अशातच पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ तुम्हाला माहित आहे का? या योजनेअंतर्गत एक उपक्रम राबविला जातो. ज्यामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम केलं जातं.

यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपये भरून पोस्टाची हि स्कीम सुरू ठेवायची आहे. या योजनेमधून तुम्हाला किती वर्षांमध्ये पैसे रिटर्न मिळतील? सोबतच अमाऊंट आणि व्याजदराची संख्या किती असेल ? या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घ्या.

8.2 टक्क्यांनी व्याजदर
या पोस्टाच्या स्कीमवर तुम्हाला 8.2 टक्क्यांनी व्याजदर दिले जात आहे. सोप्या पद्धतीने सांगायचं तर तुम्ही एका वर्षात या स्कीममध्ये 250 रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सर्वातआधी हे जाणून घ्या की, सुकन्या समृद्धी योजना डायरेक्ट 21 वर्षानंतरच मॅच्युअर होते. म्हणजे तुम्ही 21 वर्षानंतर तुमचे हक्काचे पैसे मिळवू शकता.

खात्यामध्ये 250 रुपये बचत
जर तुम्ही खात्यामध्ये 250 रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर, 21 वर्षानंतर 8.2 टक्क्यांच्या व्याजदरानुसार तुम्हाला 1,38,552 रुपये 21 वर्षानंतर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही 500 कृपयांच्या हिशोबाने देखील पैसे गुंतवू शकता. पाचशे रुपयांच्या हिशोबाने पंधरा वर्षांमध्ये एकूण 90 हजार रुपये जमा होतात. म्हणजे तर तुम्ही केलेल्या 90 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 8.2 टक्क्यांच्या व्याजदरानुसार 2,77,103 लाख रुपये 21 वर्षानंतर प्राप्त होतील.

असं उघडा खातं :
आपल्या मुलींच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना पोस्ट ऑफिसमधून किंवा बँकेमधून पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती मुलीचं नाव, वय, आई वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती भरून घ्या. त्यानंतर फॉर्ममध्ये सांगितलेल्या कागदपत्रानुसार आई-वडिलांसह मुलींचे सर्व कागदपत्र फॉर्मला अटॅच करा. त्यानंतर भरलेला फॉर्म पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन सबमिट करा तुमचं खातं उघडलं जाईल. त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करून लाभ घेण्यासाठी पात्र असाल.

News Title : Post Office Scheme Sukanya Samriddhi Yojana Benefits 03 September 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x