27 April 2025 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Patel Engineering Share Price | कंपनी बाबत अपडेट, 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, यापूर्वी 695% परतावा दिला

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स सोमवारी 4.53 टक्के वाढीसह 59 रुपये किमतीवर ओपन झाले होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार (NSE: PatelEngineering) विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 68.7 कोटी रुपये मूल्याचे 1.2 कोटी शेअर्स आहेत. नुकताच पटेल इंजिनीअरिंग आणि RVNL या दोन्ही कंपन्यांमध्ये एक एमओयू करार झाला आहे, त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)

या दोन्ही कंपन्यां नवीन करारांतर्गत हायड्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 1.49 टक्के घसरणीसह 58.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 695 टक्के नफा कमावून दिला आहे.

27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 60.71 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स फक्त 4 टक्के वाढले आहेत.

मागील तीन महिन्यात पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 13 टक्के आणि सहा महिन्यांत 8 टक्के कमजोर झाला आहे. पटेल इंजिनियरिंग ही भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनी धरणे, बोगदे, जलविद्युत प्रकल्प, रस्ते, पूल आणि स्थावर मालमत्तेचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करते.

ऑगस्ट 2024 पर्यंत पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 551 दशलक्ष डॉलर्स होते. मागील काही वर्षांत या कंपनीची आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा झाली आहे. 2023 मध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीने दिबांग पॉवर कन्सोर्टियमचे अधिग्रहण पूर्ण केले होते. यासह ही कंपनी भारताच्या पायाभूत सुविधा विकासामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जटिल अभियांत्रिकी आव्हाने सोडवण्याचे काम करत आहे.

News Title | Patel Engineering Share Price NSE: PatelEngineering 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Patel Engeneering Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या