19 April 2025 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Bigg Boss Marathi | 'तू जेलमध्ये राहून आलीयेस, तुझ्या इतका मी बावळट नाहीये; किलर गर्लला नडला पुढारी

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी सिझन 5 च्या घरामध्ये आत्तापर्यंत प्रत्येक सदस्याने धुमशान राडे घातले आहेत. दररोजचा शो संपल्यानंतर उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रोमो पाहण्यासाठी देखील उत्सुकता दर्शवताना दिसत आहेत. नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला असून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेस सज्ज झालेले सदस्य एकमेकांवर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतायत.

त्याचबरोबर या आठवड्याच्या कॅप्टन पदाचा मान अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी पटकावून घराचा भार सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अशातच आजच्या भागाचा एक खतरनाक प्रोमो वायरल झाला आहे. यामध्ये किलर गर्ल पुन्हा एकदा चर्चेत येणार असल्याचं दिसतंय. कारण की छोट्या पुढारीमध्ये आणि जानवीमध्ये जबरदस्त कल्ला झाल्याचं दिसून येतंय.

जानवी आणि घनश्याम काढतायत एकमेकांची अक्कल :
मागील आठवड्यामध्ये जानवीच्या अति-शहाणपणामुळे रितेश भाऊंनी तिला संपूर्ण आठवडा जेलबंद केलं होतं. परंतु आता नवीन आठवड्यामध्ये जानवी पुन्हा हुल्लडबाजी करण्यासाठी मोकळी सुटली आहे की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना प्रोमो पाहिल्यानंतर पडत आहे. जानवी आणि घनश्याममध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याची दिसत आहे. आजच्या भागामध्ये दोघांमधला राडा नेमका कशामुळे झाला आहे हे समजणार आहे. दोघांनी अक्षरशा एकमेकांची अक्कल काढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

जानवी मोठमोठ्याने ओरडून म्हणतीये की,”सगळ्यांना माहिती आहे तुझ्यात अक्कल नाहीये तुला अख्ख्या घराने नॉमिनेट केलं”. त्यानंतर घनश्याम सुद्धा शांत बसला नाही त्याने सुद्धा तिला हडथूड करून हुडकावून लावलं. जानवी म्हणते “तू अक्कल शून्य आहेस” तर, घनश्याम तिला उलटून म्हणतोय की,” तुझ्या इतका मी बावळट नाहीये”. दोघांचा राडा सुरू असताना इतर सदस्यांनी नेहमीसारखीच फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांना कधी एकदा एपिसोड पाहायला मिळतोय याची उत्सुकता लागली आहे.

News Title : Bigg Boss Marathi Janhvi and Ghanshyam check details 03 September 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या