18 December 2024 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305 NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 8 लाखांपर्यंत परतावा, फायद्याच्या योजनेचा लाभ घ्या EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरसाठी तज्ज्ञांकडून रेटिंग, चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Santosh Juvekar | ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं"; संतोष जुवेकरने सांगितला अनुराग कश्यपसोबतचा अनुभव

Aantosh Juvekar

Santosh Juvekar | आपला मराठी अभिनेता ‘संतोष जुवेकर’ याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. अशातच सध्या संतोषने पोस्ट केलेला एक फोटो बहुचर्चित असल्याचा दिसतोय. हा फोटो त्याच्या एकट्याचा नाहीये फोटोमध्ये ग्रेटेस्ट दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ देखील पाहायला मिळतात. दोघं अगदी बाजूला उभे आहेत. दोघांचा हा हसतानाचा फोटो पोस्ट करून संतोषने भलं मोठं कॅप्शन लिहिलं आहे.

कॅप्शन पाहिल्यावरच कळतंय की, संतोषला अनुराग कश्यप यांच्याकडून एका चित्रपटाची ऑफर आली आहे. परंतु संतोषच्या कॅप्शनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुम्हाला सुद्धा कॅप्शनची पहिली ओळ वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. नेमकं की आहे कॅप्शनमध्ये पाहूया.

संतोष जुवेकरने अनुराग यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करून लिहिलय की,”हा एक माथेफिरू दिग्दर्शक आहे, वेड्यासारखं काम करत राहायचं ह्या माणसाचं व्यसन आहे आणि ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा वेड आणि स्वप्न माझं फार आधीपासून होतं. आणि ते इतकं मनापासून पाहिलेला स्वप्न पूर्ण झालच आखिर मुझे AK बाबा का बुलावा आही गया”. अशा पद्धतीचं कॅप्शन लिहत संतोष जुवेकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संतोषने कॅप्शनमध्ये आणखीन बरंच काही लिहिलं आहे. त्याने अनुराग कश्यप यांची वाह वाह करून स्तुती केली आहे. सोबतच अनुरागने काम दिल्याबद्दल त्याचे आभार देखील मानले आहेत. परंतु एवढं सगळं सांगून संतोषने चित्रपटाचे नाव काही सांगितलं नाही. त्यामुळे चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यातच आहे. दरम्यान संतोषला कॅप्शन वाचून आणि फोटो पाहून चहात्यांनी देखील अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

अनुराग कश्यप यांनी आत्तापर्यंत रमन राघव, ब्लॅक फ्रायडे, गँग ऑफ वासेपुर यांसारखे अनेक सुपर डुपर हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. गॅंग ऑफ वासेपुरमधील डायलॉग आणि गाण्यांची अजून सुद्धा क्रेझ पाहायला मिळते.

संतोष जुवेकरचा 2009 सालचा ‘झेंडा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटांमधून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर गडबळ गोंधळ, छत्रपती शासन, सनई चौघडे, मोरया यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

आता अनुराग संतोषबरोबर नेमका कोणता चित्रपट करत आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

News Title : Film actor Aantosh Juvekar Instagram post on Anurag Kashyap 03 September 2024.

हॅशटॅग्स

#Aantosh Juvekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x