3 December 2024 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News

Body Fat Percentage

Body Fat Percentage | सध्या स्त्रियांमध्ये वाढत्या वजनाचे प्रमाण जास्त करून पाहायला मिळते. बऱ्याच महिलांना पोट कमी न होणे, कंबर, पोट आणि मांड्यांवर अतिरिक्त चरबी साठायला सुरुवात होणे या समस्या सामोरे जावे लागत आहे. काही महिला तर प्रॉपर डायट प्लॅन फॉलो करून आणि नियमितपणे व्यायाम करून देखील त्यांचं वजन किंचितभर सुद्धा कमी झालेलं नाही. या वाढत्या वजनाचं नेमकं कारण काय? सोबतच व्यायाम आणि डायट करून सुद्धा वजन का कमी होत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. वाचा सविस्तर बातमी.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी बरेचजण आपले आवडते पदार्थ खाण्यावर पाणी सोडतात. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लठ्ठ महिला वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायट प्लॅन आणि एक्सरसाइज पाहून फॉलो करत असतात. परंतु काहीही केलं तरी वजन कमी होत नाही अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते.

वजन कमी न होण्याचं हे आहे मुख्य कारण :
तुम्ही भरपूर अंग मेहनत घेऊन सुद्धा आणि खाण्यापिण्याचं पथ्य पाळून सुद्धा वजन कमी होत नसेल तर याचं कारण स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव असू शकतो. या सगळ्यांमध्ये डॉक्टर लवलीन कौर सांगतात की, तुम्ही व्यायाम आणि डायट करण्याची संपूर्ण मेहनत घेतली आणि त्याचबरोबर भरपूर स्ट्रेस देखील घेतला तर इंचभर देखील वजन कमी होणार नाही. ताणतणावामुळे तुमच्या वजन कमी होण्याच्या जर्नीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस
प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असू शकतो. कोणाला रिलेशनशिपचा, कोणाला ऑफिसमधील बॉक्सचा तर कोणाला मानसिक आजारामुळे देखील ताणतणाव अधिक वाढू शकतो. या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊन वजन वाढीस लागते. बऱ्याचदा जास्त ताणतणावामुळे आपण ओवर ईटिंग करतो. म्हणजेच जास्त प्रमाणात खाऊ लागतो. तसं केल्यावर आपल्याला थोडाफार प्रमाणात हलके वाटते. मन तर हलकं होतं पण पोट मात्र गच्च भरते आणि ही क्रिया स्वतःच चालू असल्याने तुमचं वजन कमी होता होत नाही.

हार्मोन्समुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते
शरीरामधील बदललेल्या हार्मोन्समुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. सोबतच स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात वाढतो. ज्यामुळे वजन कमी करण्याची क्रिया मंदावते आणि म्हणूनच सब झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. जास्त स्ट्रेस आला असेल तर योगा किंवा प्राणायाम केले पाहिजे.

Latest Marathi News | Body Fat Percentage 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Body Fat Percentage(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x