19 September 2024 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Jio Finance Share Price | 8 महिन्यात दिला 46% परतावा, फायद्याची अपडेट आली, स्टॉक 'BUY' करावा?

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये आज नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 7.12 टक्के वाढीसह 344.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. मंगळवारी या कंपनीचे 222.14 कोटी रुपये मूल्याचे 66.09 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश)

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 1.20 टक्के घसरणीसह 346 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जियो फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाले होते. त्यांनतर कंपनीने आपल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गृहकर्ज सेवा लॉन्च करण्याची घोषणा केली होती. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मालमत्ता आणि सिक्युरिटीजवर कर्ज देण्याची सुविधा सुरू करणार आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि BlackRock या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे संयुक्त उपक्रम सुरू करणार आहेत. जुलै 2023 मध्ये दोन्ही भागीदारांनी 150 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करून संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. विमा आघाडीवर Jio Insurance Broking Limited कंपनीने 31 आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. तसेच कंपनी आपल्या JioFinance ॲपद्वारे विमा सेवा प्रदान करत आहे.

2024 या वर्षात Jio फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.18 कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE 200 इंडेक्सचा भाग आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स इंटरनॅशनल लीजिंग IFSC लिमिटेड मध्ये 6,75,00,000 गुंतवणूक केली केली आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE: JioFinance 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x