19 September 2024 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

HAL Share Price | डिफेन्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 6145 रुपयांचा लेव्हल स्पर्श करणार

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मंगळवारी एचएएल स्टॉक 5 टक्के (NSE: HAL) वाढीसह 4925 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. नुकताच एचएएल कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)

भारत सरकारच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडून 240 AL-31 FP एरो इंजिन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचे एकूण मुल्य 26000 कोटी रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत एरो इंजिनची डिलिव्हरी एक वर्षानंतर सुरू होईल आणि पुढील 8 वर्षांत पूर्ण केली जाईल. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.63 टक्के वाढीसह 4,911 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, एचएएल स्टॉक पुढील काळात 6000 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणून ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 6145 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

आर्थिक वर्ष 2023-2024 अखेर एचएएल कंपनीचा ऑर्डर अनुशेष 94000 कोटी रुपये होता. जो आता 1.2 लाख कोटी रुपयेवर पोहोचला आहे. मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 150 टक्के वाढली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1981.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर 4925 रुपये किमतीवर पोहचले होते.

2024 या वर्षात एचएएल स्टॉक 75 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी एचएएल स्टॉक 2826.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5675 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1767.95 रुपये होती.

News Title | HAL Share Price NSE: HAL 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x