19 September 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

RVNL Share Price | तज्ज्ञांकडून RVNL शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 630 रुपयांचा लेव्हल स्पर्श करणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 604 रुपये किमतीवर (NSE: RVNL) ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे 11.95 लाखांपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. आरव्हीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,24,923.98 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पटेल इंजिनिअरिंग कंपनीसोबत करार केला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

या कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागात 2x25KV प्रणालीमध्ये 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट, आणि सब सेक्शनिंग पोस्टचे डिझाइन, पुरवठा, उभारणी, चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 203 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.56 टक्के घसरणीसह 591.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्येक स्टॉकवर 21.1 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरवर 2.11 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर हा दिवस एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे.

शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांनी आरव्हीएनएल स्टॉक ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 630 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना 588 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे.

आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 इंडेक्सचा भाग आहे. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल स्टॉक 226 टक्के, 3 महिन्यांत 49.16 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 231.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 336.42 टक्के, 2 वर्षात 1742.29 टक्के, 3 वर्षात 1911.17 टक्के, 5 वर्षात 2424.48 टक्के मजबूत झाला आहे. मागील वर्षी आरव्हीएनएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला होता. एप्रिल 2023 मध्ये या कंपनीने 1.77 रुपये आणि सप्टेंबर 2023 मध्ये 0.36 रुपये लाभांश वाटप केला होता.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x