19 April 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Pension Money | नोकरदारांनो! टेन्शन नको, मिळेल 50,000 रुपये पेन्शन; महिना खर्चाचं टेन्शन मिटेल - Marathi News

Pension Money

Pension Money | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या रिटायरमेंटनंतरची चिंता सतावत असते. यासाठी अनेकजण 25 ते 30 वयापासूनच वेगवेगळ्या फंडमध्ये किंवा सरकारी योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणे सुरू करतात. सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास काळजी नसते.

परंतु असं काही नाही तुम्ही कमी वयातच नाही तर, चाळीशीत देखील पैसे इन्वेस्ट करू शकता आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत तब्बल 50 ते 51 हजार रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेऊ शकता. बऱ्याच व्यक्ती सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवण फायद्याचं मानतात. तुम्हाला सुद्धा सेवानिवृत्तीनंतर महिन्याला 50000 पर्यंत पेन्शन हवी असेल तर NPS म्हणजेचं ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ चा पर्याय तुम्ही निवडू शकता.

सेवानिवृत्त योजनांमधील नॅशनल पेन्शन सिस्टम ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. ही योजना मार्केटशी लिंक असल्यामुळे योजनेतील उत्पन्न मार्केटमधील कामावर उपलब्ध असेल.

50 हजार प्रत्येक महिन्याला कसे मिळणार?
वयाच्या चाळीशीत पन्नास हजार रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोठी रक्कम गुंतवावी लागेल. 50000 पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये गुंतवावे लागतील. हे योगदान तुम्हाला 65 वर्षापर्यंत सुरू ठेवावं लागेल. म्हणजेच 25 वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

नॅशनल पेन्शन सिस्टममधील गुंतवणुकीचे नियम?
या योजनेमध्ये गुंतवणुकीची अट 18 ते 70 वयोगटापर्यंतच आहे. त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवलेली रक्कम दोन भागांत विभागली जाते. यामधील 60% रक्कम तुम्ही सेवानिवृत्तीनंतर काढून घेऊ शकता. तसेच तुमची 40% रक्कम ॲन्यूइटीमध्ये जमा होईल. ही पेन्शन योजना फंड प्राधिकरण आणि नियामकद्वारे चालवली जाते.

NPS कॅल्क्युलेशन :
समजा तुम्हाला चाळीसावं वर्ष सुरू झालं आणि मागील 25 वर्षांत तुम्ही एकूण 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल. तर, 10 % च्या हिशोबाने 1,55,68,356 एवढी रक्कम व्याजाचीच बाजूला पडते. अशाप्रकारे टोटल 2,00,68,356 या किमतीचे कॉप्रस तयार होईल. आता यामधील 60% म्हणजेच तब्बल 1,20,41,013 एवढी रक्कम एकदाच काढू शकता. उरलेली 80,27,342 म्हणजे असं 40% रक्कम ॲन्यूइटीमध्ये जमा होईल. आता हि रक्कम लक्षात घेता 8% च्या हिशोबाने 52,516 एवढी पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळेल.

Latest Marathi News | Pension Money from NPS 08 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pension Money(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या