22 November 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

HAL Share Price | मालामाल करणार HAL शेअर, ऑर्डरबुक झाली मजबूत, यापूर्वी 5 वर्षांत दिला 1400% परतावा

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4,925 रुपये किमतीवर (NSE: HAL) ट्रेड करत होते. नुकताच भारत सरकारच्या कॅबिनेट सुरक्षा समितीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी Su-30 MKI विमानांसाठी 240 एरो-इंजिन AL-31FP खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या डीलचे एकूण मुल्य 26,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.30 टक्के घसरणीसह 4,798.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (एचएएल कंपनी अंश)

एचएएल कंपनीकडून मागणी करण्यात आलेल्या एरो-इंजिनची डिलिव्हरी एक वर्षानंतर सुरू करणार आहे. ही डिलिव्हरी पुढील आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल. एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे या इंजिनांमध्ये 54 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. एचएएल कंपनीच्या कोरापुट विभागात हे इंजिन बनवले जाणार आहे.

सुखोई Su-30 MKI फायटर जेट रशियन विमान निर्माता कंपनी सुखोईने विकसित केले आहे. हे विमान दोन आसनी, ट्विनजेट मल्टीरोल एअर सुपिरिऑरिटी फायटर जेट असून भारतीय हवाई दलासाठी एचएएल द्वारे तयार करण्यात आले आहे. Su-30 MKI हा IAF च्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यांपैकी एक मानला जातो. एचएएल कंपनीद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा झाल्यास भारताच्या संरक्षण सज्जतेला मजबुती प्राप्त होईल.

मागील तीन वर्षांत एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 591 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 1400 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 144 टक्के आणि 2 वर्षात 306 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 जुलै 2024 रोजी एचएएल स्टॉक 5674.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या उच्चांक किमतीवरून हा स्टॉक 15.11 टक्क्यांनी घसरला आहे.

News Title | HAL Share Price NSE: HAL 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x