22 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

EPF Pension Money | प्रायव्हेट कंपनीत नोकरी करता? तुमच्या बेसिक सॅलरीनुसार इतकी महिना EPS पेन्शन मिळेल - Marathi News

EPF Pension Money

EPF Pension Money | प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला नोकरी केल्यानंतर रिटायरमेंटच्या स्वरूपात सेवानिवृत्ती दिली जाते. त्यांना रिटायरमेंटची पेन्शन देखील चालू होते. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारा कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन मिळते. परंतु प्रायव्हेट किंवा ऑर्गनाईज सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या माध्यमातून रिटायरमेंट स्कीम मिळते.

या स्कीमचं नाव EPS रिटायरमेंट स्कीम असं आहे. ही ईपीएफओच्या अंतर्गत चालवली जाते. दरम्यान ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची बेसिक + DA ची अमाऊंट ईपीएफ खात्यामध्ये जमा होते. ती अमाउंट तुम्ही आणि कंपनी दोघं मिळून तुमच्या खात्यात जमा करतात. परंतु या अमाऊंटचे दोन भाग केले जातात. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 3.67% एवढा भाग ईपीएफमध्ये जातो तर, 8.33% हा भाग ईपीएसमध्ये जातो.

एवढे वर्ष करावे लागेल कॉन्ट्रीब्युशन :
ही सुविधा इपीएस अंतर्गत असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी दहा वर्षांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. म्हणजे किमान दहा वर्ष तुम्हाला नोकरी करावी लागेल. तसं पाहायला गेलं तर मॅक्झिमम पेन्शन सर्विस ही 35 वर्षांची आहे.

ईपीएस अंतर्गत योजनेचा हा फॉर्मुला 15 नोव्हेंबर 1995 मध्ये संघठीत क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लागू होणार. या आधीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम लागू होतात. अशातच कर्मचारी संघठन महागाई आणि वेजस्ट्रक्चर लक्षात घेऊन सरासरी पगाराची लिमिट वाढवण्याची मागणी करतायत.

पेन्शनचा हा फॉर्मुला समजून घ्या :
EPS= सरासरी सॅलरी × पेन्शनेबल सर्विस/70. याचा साधा अर्थ बेसिक सॅलरी+DA आहे. ही अमाऊंट 12 महिन्यांच्या आधारावर काढली जात असून, मॅक्झिमम पेन्शन सर्विस 35 वर्ष आहे आणि पेन्शन वेतन 15,000 रुपये. या पेन्शनचा जास्त भाग 15,000×8.33=1250 एवढी अमाउंट प्रत्येक महिन्याला आहे. दरम्यान मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशनच्या हिशोबाने तुमच्या नोकरीची दर वर्षाची ईपीएस कॅल्क्युलेशन काढायची झाली तर, प्रत्येक महिन्याला EPS =15,000 × 35 / 70= 7,500 एवढी अमाऊंट निघते. या फॉर्मुलाचा वापर करून तुम्ही अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकता.

पेन्शनपासून जोडलेले नियम :
EPS च्या नियमावलीप्रमाणे 58 वर्षांपर्यंत कर्मचारी टेन्शन घेण्यासाठी सज्ज असतो. त्याला तो हक्क 58 वर्षाचे झाल्यावर मिळतो. जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला 58 च्या आधीच पेन्शन हवी आहे तर ही सुद्धा Early pension ही तरतूद EPS अंतर्गत आहे. परंतु या तरतुदीचा वापर केल्याने म्हणजेच 58 वर्षाच्या आधीच पेन्शन घेतल्याने दरवर्षी 4% अमाऊंट कापून घेतली जाणार. समजा तुमचं वय 56 वर्षापर्यंत आहे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला मासिक पेन्शनचा लाभ घेताय तर, तुम्हाला मिळणाऱ्या पैशांवर 92% अमाऊंट दिली जाणार. परंतु तुम्ही 58 च्या पुढे म्हणजेच 60 वर्षानंतर पेन्शन घेण्याचा लाभ सुरू केला तर सामान्य पेन्शनपेक्षा 8% अमाऊंट जास्त मिळणार.

Latest Marathi News | EPF Pension Money 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Pension Money(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x