19 September 2024 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Smart Investment | दररोज 10 रुपयांची बचत बनवेल लखपती; स्वतःसाठी कार देखील विकत घेऊ शकता

Smart Investment

Smart Investment | भविष्यासाठी पैसे साठवण्याची वेळ आली की प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून हे वाक्य हमखास निघतं ते म्हणजे ‘अरे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पगारामधून पैसेच उरत नाही तर, बचत कुठून करणार?’ परंतु तुम्ही तुम्हाला असलेली सिगारेट फुंकायची सवय फोडली तर, सिगारेटला खर्च होणारे दहा रुपये वाचवून सुद्धा तुम्ही लखपती बनू शकता. का, बसला ना आश्चर्याचा धक्का?. पण तुम्ही ऐकता आहे ते अगदी बरोबर आहे. ही जबरदस्त योजना म्युचल फंडच्या अंतर्गत एसआयपीद्वारे केली जाते.

या म्युचल फंडमध्ये तुम्ही दररोजचे फक्त दहा रुपये साठवून लखपती बनू शकता. लॉंगटर्ममध्ये पैसे साठवून तुम्ही स्वतःसाठी एक अलिशान कार देखील विकत घेऊ शकता. एवढी ताकद दहा रुपयांमध्ये आहे. कारण की एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंग फायदा मिळतो. सोबतच दीर्घकाळ असला तरी जास्तीचा रिटर्न मिळतो.

एसआयपी म्हणजे नेमकं काय?
म्युचल फंडमध्ये अगदी सहजरीत्या इन्व्हेस्ट करण्याचा मार्ग म्हणजे एसआयपी. एस आय पी द्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला म्युचल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकता. ही म्युचल फंडची एसआयपी स्कीम बँक RD आरडीप्रमाणेच काम करते. परंतु जास्तीचे रिटर्न तुम्हाला हि स्किम मिळवून देऊ शकते. एसआयपीमध्ये तुमच्या बँक अकाउंटमधून एक ठराविक रक्कम कापून टाकली जाते.

300 रुपयांची एसआयपी :
तुम्ही प्रत्येक महिन्याला 300 रुपयांची एसआयपी करू शकता. दररोज दहा रुपये वाचून तीनशे रुपये एसआयपीमध्ये गुंतवा. ही गुंतवणूक प्रत्येक वर्षाला दहा टक्क्यांनी वाढवायची आहे. या स्मॉल इन्वेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवून तुम्ही लॉंगटर्ममध्ये पुढील 30 वर्षांत 45 लाख रुपयांपर्यंत पैसे जमवू शकता.

या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न अमाऊंट मिळून 45 लाखांचा फंड जमा होईल. एवढेच नाही तर तुम्ही यामध्ये केलेली गुंतवणूक पाच लाख 92 हजार रुपयांपर्यंत असेल. मार्केटमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या लॉन्गटर्ममध्ये चांगला परतावा मिळवून देतात.

News Title : Smart Investment through Mutual Fund SIP check details 05 September 2024.

हॅशटॅग्स

#Smart Investment(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x