21 September 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

Trending News | भारतामधील या गावात प्रत्येक पुरुष 'ही' गोष्ट दोनदा करतो, तरुणांना ही प्रथा अजिबात आवडत नाही

Trending News

Trending News | भारतामधील बऱ्याच गावांमध्ये त्या-त्या भागातल्या वेगवेगळ्या प्रथा अजून देखील सुरू आहेत. ज्यामध्ये लग्न व्यवस्थेचा मोठा समावेश आहे. अगदी महाराष्ट्रात राहणारे सर्वच महाराष्ट्रीय असले तरीसुद्धा वेगवेगळ्या भागाचे आहेत. प्रत्येक भागामध्ये विवाह पद्धती वेगवेगळ्या असतात.

काहीजण जुन्या चालीरीती सोडून पुढे चालण्याचा प्रयत्न करतात तर, काहीजण संस्कृती म्हणून वारसा पुढे चालवतात. परंतु आज आम्ही राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशामध्ये वसलेल्या रामदेयो या गावातील एक प्रथा सांगणारा. ही प्रथा ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील.

वाळवंटी प्रदेशामधील या गावात प्रत्येक पुरुष एक नाही तर दोन लग्न करतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे ही प्रथाच मानली जाते. लग्न लावताना आज दोन मुलींबरोबर पुरुषाचं लग्न लावलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्हीही बायका एकाच छताखाली नांदण पसंत करतात.

तेथील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की पुरुषांनी फक्त एकच लग्न केलं तर, त्या घरात मुलगीच जन्माला येते पण दुसऱ्या लग्न केल्यावर मुलगा जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रथा अजून सुद्धा या गावामध्ये सुरू आहे.

परंतु गावामधील नवीन पिढी या परंपरेकडे वेगळ्या नजरेने पाहते. एकच व्यक्तीने दोन लग्न करणे हे कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अशा परंपरा बंद झाल्या पाहिजे. असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

दरम्यान अद्यापही प्रशासनाने अशा परंपरेवर बंदी घातलेली नाहीये. प्रशासन म्हणतोय की आम्ही या गोष्टींची पूर्णपणे तपासणी करू आणि मगच निर्णय घेऊ.

आज गाव आणि खेड्यांमधील तरुण पिढी साक्षर झाली आहे. त्यामुळे धार्मिक पद्धतींना संस्कृतीचे नाव देऊन सुरू ठेवणाऱ्या चालीरीतींना तरुण पिढी खतपाणी घालत नाही.

News Title : Trending News Ramdeyo Rajasthan marriage traditions 05 September 2024.

हॅशटॅग्स

#Trending News(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x