22 November 2024 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi

Reliance Share Price

Reliance Share Price | नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीचे (NSE: Reliance) शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. हा बोनस इश्यू या कंपनीचा 6 वा बोनस इश्यू आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

या कंपनीने 1977 मध्ये भारतीय शेअर बाजारात पदार्पण केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 7 पट ओव्हरसबस्क्राइब झाला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.67 टक्के घसरणीसह 2,936 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीने 1980, 1983, 1997, 2009 आणि 2017 मध्ये मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने सर्वात पहिल्यांदा 3:5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

1983 मधे या कंपनीने 6:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर आता या कंपनीने पुन्हा बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 7 सप्टेंबर हा दिवस एक्स-बोनस आणि रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. 6 सप्टेंबर, 2017 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 752.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 3000 रुपयेच्या जवळ ट्रेड करत आहे.

मागील 7 वर्षांत मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 305 टक्क्यांनी वाढला आहे. बोनस जारी होण्याच्या आधी 4 सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3029.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 17 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 175.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 547 टक्के मजबूत झाला आहे.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x