22 November 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये मोठी चर्चा - Maharashtranama Marathi

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. (P N Gadgil Jewellers LTD GMP)

शेअर्स प्राईस बँड आणि ग्रे-मार्केट संकेत
पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO साठी शेअर्सची किंमत बँड 456-480 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 180 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक 660 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. या कंपनीचा IPO स्टॉक 17 सप्टेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो. या IPO चा आकार 1100 कोटी रुपये आहे.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स या महाराष्ट्रस्थित कंपनीच्या IPO मध्ये 850 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स वाटप केले जाणार आहेत. तसेच SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार असल्याची माहिती दिली आहे.

सध्या एसव्हीजी बिझनेस ट्रस्टकडे पी एन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचे 99.9 टक्के भागभांडवल आहे. ही कंपनी IPO मधून मिळणारी रक्कम व्यवसाय विस्तार योजना आणि कर्ज परतफेडीसाठी खर्च करणार आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, IPO इश्यूनंतर या कंपनीचे बाजार भांडवल 6,500 कोटी रुपयेपेक्षा जास्त वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कंपनी काय करते?
पीएन गाडगीळ ज्वेलर्स ही कंपनी 2013 मध्ये स्थापन झाली होती. पीएन गाडगीळ ज्वेलर्स ही कंपनी मुख्यतः सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरीसह मौल्यवान धातूचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी पुणेस्थित आपल्या ग्राहकांना मेड-टू-मेजर ज्वेलरी बनवण्याचा पर्याय देते.

या कंपनीकडे सध्या एकूण 33 स्टोअर्स आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये कंपनीचे 18 स्टोअर्स आहेत. तसेच अमेरिकेत या कंपनीचा एक स्टोअर आहे. कंपनीच्या मालकीची 23 स्टोअर्स फ्रँचायझी मॉडेल अंतर्गत चालत आहेत. तसेच 10 स्टोअर्स कंपनीद्वारे चालविली जात आहेत.

News Title | IPO GMP of P N Gadgil Jewellers LTD 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IPO GMP(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x