22 November 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

HAL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत! HAL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - Maharashtranama Marathi

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच भारत सरकारने एचएएल (NSE: HAL) कडून Su-30 MKI लढाऊ विमानासाठी 240 एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही बातमी जाहीर झाल्यावर एचएएल स्टॉक 5 टक्के वाढला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 4,703 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (एचएएल कंपनी अंश)

केंद्रीय मंत्रिमंडळाने एचएएल कंपनीकडून एरो-इंजिन इंजिन खरेदी करण्यासाठी 26,000 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या एरो-इंजिनची डिलिव्हरी एका वर्षभरानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या आत हे काम पूर्ण केले जाईल. एरो-इंजिनच्या निर्मितीमध्ये 54 टक्केपेक्षा जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. एचएएल कंपनी हे एरो-इंजिन कोरापुट युनिटमध्ये तयार करणार आहे. Su-30 MKI हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमान मानले जाते.

मागील 6 महिन्यांत एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 143 टक्के वाढले आहेत. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,333 टक्के वाढली आहे. या PSU स्टॉकचे लाभांश उत्पन्न 0.80 टक्के आहे. ही कंपनी सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करत असते.

जून 2024 तिमाहीत एचएएल कंपनीने 1,437 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 814 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीत एचएएल कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 11 टक्के वाढून 4,347 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीचा EBITDA 13 टक्के वाढून 994 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत एचएएल कंपनीचा EBITDA 880 कोटी रुपये नोंदवला गेला होता. दरम्यान, या कंपनीचा EBITDA मार्जिन 39 bps वाढून 22.9 टक्के झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 22.5 टक्के होते.

News Title | HAL Share Price NSE: HAL 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x