22 November 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Bank Special Scheme | महिलांसाठी खुशखबर! SBI देतयं गॅरेंटीशिवाय लोन, फायद्याची सरकारी स्कीम - Marathi News

SBI Bank Special Scheme

SBI Bank Special Scheme | गरजू महिलांसाठी सरकार द्वारा वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहावी, तिला कोणाच्याही आधाराची गरज भासू नये आणि संपूर्ण जगाबरोबर तिला सुद्धा तीची स्वप्न पूर्ण करता यावी आणि योजनांमार्फत गरजू महिलांना रोजगार मिळावा यासाठी सरकार अनेक योजना राबवत असतात.

अशातच सरकारने खास महिलांसाठी आणखीन एक योजना आणली आहे ती म्हणजे ‘स्त्री शक्ती योजना’. विशेष म्हणजे या योजनेला स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चं पाठबळ मिळालं आहे. या स्कीममध्ये एक लिमिट दिली गेली आहे ज्यामध्ये सेफ्टी देण्याची गरज भासत नाही. योजनेबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.

एसबीआय ही बँक सरकारी बँक असल्यामुळे अनेक व्यक्ती आपले पैसे इथे सुरक्षित राहतील सोबतच आपल्याला लोन मिळवण्यासाठी ही बँक बेस्ट राहील असं वाटत असतं. सरकारद्वारा राबविण्यात येणाऱ्या या योजनेचं नाव एसबीआय स्त्री सशक्त योजना असं असून महिलांना या योजनेअंतर्गत तब्बल 25 लाख रुपये एवढं लोन घेता येणार आहे.

या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे जर तुम्ही 5 लाखांपर्यंत लोन घेण्याचा विचार केला तर तुम्हाला सिक्युरिटी म्हणून काहीही देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे या योजनेमार्फत अनेक महिलांना प्रचंड प्रमाणात लाभ होणार आहे. महिलांना स्वतःचा बिजनेस चांगल्या स्वरूपात स्थापन करता येणार आहे.

दोन लाखांपर्यंत घ्या लोन :
या योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाखांपर्यंत लोन घेऊ शकता. दरम्यान तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर 0.5 % कमी व्याजदर द्यावं लागेल.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे बेस्ट योजना :
स्त्री सशक्त ही योजना बिझनेस करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 25 लाख रुपये लोन घेऊन महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. दरम्यान ही स्कीम गावातील तसेच शहरातील महिलांसाठी देखील सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही या योजनेचा लाभ एसबीआय बँकेच्या अंतर्गतच घेऊ शकता.

काय असावी वयोमर्यादा?
एसबीआय अंतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचं 18 वर्ष वय पूर्ण असायला हवं. म्हणजेच 18 वर्षानंतरची कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. जर एखादी महिला आधीपासूनच कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पार्टनर असेल तर त्यांच्याजवळ कमीतकमी 51 % शेअर कॅपिटल असणं गरजेचं आहे. एवढेच नाही तर महिला कोणत्याही औद्योगिक विकास कार्यक्रमाचा भाग असली पाहिजे.

या योजनेमध्ये लोन घेण्यासाठी एसबीआय बँक का आहे फायद्याची?
इतर बँकांपेक्षा एसबीआय बँकेकडून अगदी सहजरीत्या लोन मिळवलं जाऊ शकत. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसारख्या अनेक बँका स्त्री शक्ती योजनेसारख्या अनेक योजना राबवतात परंतु इतर बँकांपेक्षा एसबीआय बँक तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण की या स्कीमचे व्याजदर अतिशय कमी ठेवले आहेत. जर एखादी महिला या स्कीम अंतर्गत लोन घेऊन इच्छिते तर संपूर्ण लोन प्रोसेस करून सिबिल स्कोर चेक केला जाणार. सोबतच बँक इंटरेस्ट रेट देखील ठरणार.

Latest Marathi News | SBI Bank Special Scheme 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Bank Special Scheme(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x