10 November 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
x

Post Office Scheme | जबरदस्त योजना, 1000 रुपयांच्या बचतीवर 4 लाख रुपये फक्त व्याजाचे मिळतील - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | आता सर्वसामान्यांसाठी पोस्टाने एक भन्नाट स्कीम आणली आहे. या स्किमचं विशेष कारण म्हणजे तुम्ही फक्त एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये फक्त व्याजानेच 4 लाख रुपयांची कमाई करू शकता. ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट म्हणजेच (टीडी) ही योजना राबवली जात आहे. या योजनेबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन माहित करून घेण्यासाठी वाचा सविस्तर.

खातं उघडण्यासाठी कोण कोण आहे पात्र?
हे खातं उघडण्यासाठी नागरिक भारतीय असणं गरजेचं आहे. टीडी म्हणजेच पोस्टाच्या टाईम डिपॉझिटमध्ये 18 वर्षीय व्यक्ती स्वतःचं खातं उघडू शकतो. त्याचबरोबर 10 वर्ष पूर्ण झालेलं मूल देखील स्वतःच्या हस्ताक्षराने टिडीमध्ये खातं उघडू शकतो. लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील अकाउंट ओपन करून इन्व्हेस्ट करू शकतात. एवढेच नाही तर 1000 रुपयांची गुंतवणूक करून तीन ज्येष्ठ नागरिक देखील संयुक्त खातं उघडू शकतात.

एवढे वर्ष करू शकता गुंतवणूक :
टाईम डिपॉझिट या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला शॉर्ट टर्मपासून ते लॉन्ग टर्मपर्यंत पर्याय दिले जातात. यामध्ये एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांपर्यंतचा टाईम दिला गेला आहे. ही स्कीम एफडीप्रमाणेच काम करते. या योजनेमध्ये तुमच्या गुंतवणुकीनुसार दिल्या गेलेल्या वेळेतच तुमची अमाऊंट मॅच्युअर होते. जर तुम्ही पाच वर्षांसाठी एक हजार रुपये गुंतवत असाल तर तुम्हाला किती अमाऊंट परत मिळेल पाहूया.

5 वर्षांसाठी 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन :
टाईम डिपॉझिटमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक रुपये तुम्ही गुंतवू शकता. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 7.5% व्याजदर मिळेल. म्हणजे तूम्ही 5 वर्षांमध्ये टाईम डिपॉझिटवर 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली की, मॅच्युरिटीवर व्याजदराच्या हिशोबाने 14,49,949 एवढा फंड प्राप्त होईल. याचाच अर्थ तुम्ही फक्त व्याजदरानेच तब्बल 4,49,949 एवढे रुपये कमवू शकता.

टॅक्स सूट देखील मिळेल :
या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये स्कीम मॅच्युअर होण्याआधी पैसे काढले जाऊ शकतात परंतु तुम्हाला पेनल्टी चार्ज द्यावा लागेल तरच तुम्ही पैसे काढू शकता. दरम्यान 5 वर्षाच्या टाईम डिपॉझिट अकाउंटवर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या अंतर्गत सेक्शन 80C नुसार तुम्हाला टॅक्स सूट देखील मिळणार आहे.

या योजनेमध्ये वर्षाच्या हिशोबाने मिळणारे व्याजदर :
जर तुम्ही 1 वर्षापर्यंत या स्कीमचा लाभ घेत असाल तर 6.9% यादराने वर्षाचं व्याजदर कॅल्क्युलेट केलं जाईल. तसेच दोन वर्षांसाठी 7.0%, तीन वर्षांसाठी 7.0% तर, पाच वर्षांसाठी 7.5% या हिशोबाने व्याजदर असणार आहे. दरम्यान ज्या दिवशी तुम्ही खात उघडाल त्या दिवसापासून एक वर्ष होईपर्यंतचे दिवस मोजले जातील आणि ठराविक दिवसालाच तुमच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा केली जाईल. सोबतच टाईम डिपॉझिटवरील गुंतवणुकीच्या व्याजाची गणना ही तिमाही चक्रवाढीच्या व्याजदरावर केली जाणार आणि वर्षाच्या शेवटी संपूर्ण व्याजदर तुमच्या खात्यात जमा केले जाणार.

Latest Marathi News | Post Office Scheme 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(183)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x