20 September 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss Marathi | वाइल्ड कार्ड सदस्य संग्रामवर प्रेक्षकांची नाराजगी "संग्राम; मोठा बैल झाला राव; ज्याच्यासाठी पाठवलं Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - Marathi News IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
x

NTPC Share Price | NTPC शेअर 423 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी स्टॉकमध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा (NSE: NTPC) सल्ला दिला आहे. ही कंपनी आपल्या पहिल्या अणुभट्टीच्या विकासाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. एनटीपीसी कंपनीने अणुभट्टी उभारणीसाठी 4 ते 5 राज्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासह कंपनीने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीसोबत 4×700 मेगावॅट क्षमतेचा अणुप्रकल्प उभारणीसाठी करार केला आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)

शुक्रवारी हा स्टॉक 1 टक्क्यांच्या घसरणीसह 396.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 404.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 395.05 रुपये होती. शुक्रवारी या कंपनीचे 52.22 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,84,569.78 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एनटीपीसी स्टॉक पुढील काळात 418 ते 423 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 387 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.81 टक्के घसरणीसह 387.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एनटीपीसी लिमिटेड ही सरकारी कंपनी बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचा भाग आहे. मागील एक आणि 2 आठवड्यात एनटीपीसी स्टॉक अनुक्रमे 4.61 टक्के आणि 1.14 टक्क्यांनी कमजोर झाला होता.

मागील 3 आणि 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 13.49 टक्के आणि 12.89 टक्क्यांनी मजबूत झाले होते. YTD आधारे एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 28.34 टक्क्यांनी वाढले होते. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 71.28 टक्के, 135.87 टक्के, 241.09 टक्के, 212.76 टक्के आणि 234.03 टक्के परतावा कमावून दिला आहे.

NTPC लिमिटेड कंपनीने फेब्रुवारीमध्ये 2.25 रुपये आणि ऑगस्ट 2024 मध्ये 3.25 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील वर्षी या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना तीन वेळा लाभांश वाटप केला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये एनटीपीसी कंपनीने 4.25 रुपये, ऑगस्ट 2023 मध्ये 3 रुपये आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 2.25 रुपये लाभांश वाटप केला होता. सध्याच्या बाजारभावानुसार एनटीपीसी कंपनीचे एकूण लाभांश उत्पन्न 1.95 टक्के आहे.

Latest Marathi News | NTPC Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x