22 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

SBI Bank FD | SBI बँक FD वर मिळतोय मोठा व्याजदर, 1 ते 5 वर्ष कालावधीत मिळणारी रक्कम नोट करा - Marathi News

SBI Bank FD

SBI Bank FD | एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत नोकरदारांसाठी आणि पेन्शनकर्त्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. दरम्यान एसबीआय बँकेमध्ये एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटच्या सुविधेमध्ये वेगवेगळ्या वर्षासाठी वेगवेगळे व्याजदर दिले जातात. जर तुमच्या जवळ 10 लाख रुपयांपर्यंत पैसे असतील आणि तुम्हाला ते पैसे फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवायचे असतील तर, एसबीआयची स्पेशल स्कीम तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.

या स्कीममध्ये सात दिवसांच्या कालावधीपासून ते दहा वर्षांच्या कार्यकाळापर्यंत मॅच्युरिटी जमा करू शकता. जर तुम्ही 10 लाखांची एफडी एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी केली तर, तुम्ही किती व्याजदराची रक्कम कमावू शकता? पाहूया.

एक वर्षाचा कार्यकाळ :
जर तुम्ही दहा लाख रुपये एका वर्षाच्या कार्यकाळासाठी डिपॉझिट करत असाल तर, एक वर्षासाठी मॅच्युरिटी डिपॉझिटवर 6.80 % व्याजदर आहे. या हिशोबाने 10 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एका वर्षामध्ये 10,69,753 रुपयांची कमाई होते. त्यामुळे तुम्हाला एकूण 69,753 रुपयांच्या लाभ होतो.

दोन वर्षांचा कार्यकाळ :
दोन वर्षांच्या मॅच्युरिटी डिपॉझिटवर 7% एवढं व्याजदर आहे. या हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये 11,48,881 रुपये जमा होतील. यामध्ये तुमची फिक्स्ड इन्कम 48,881 एवढी असेल.

तीन वर्षांचा कार्यकाळ :
तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मॅच्युरिटी डिपॉझिट व्याजदर 6.75% आहे. या हिशोबाने दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुमच्या खात्यात तब्बल 12 लाख 22 हजार 393 एवढे रुपये जमा होतील. म्हणजे तुमची फिक्स्ड इनकम 2,22,393 एवढी असेल.

पाच वर्षांचा कार्यकाळ :
पाच वर्षांच्या मॅच्युरिटी डिपॉझिटवर तुम्हाला 6.50% व्याजदराने दहा लाख रुपये इन्वेस्ट केल्यास 13 लाख 80 हजार 419 रुपये जमा होतील. यामधील 3,80,419 रुपये तुमच्या खात्यात व्याजदराचे जमा होतील.

SBI सीनियर सिटीजन इंटरेस्ट रेट :
एसबीआय सीनियर सिटीजनसाठी सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के म्हणजेच (0.50%) जास्त व्याज देते. एसबीआय विकेअर डिपॉझिट अंतर्गत पाच वर्ष किंवा त्यापेक्षा आणखीन कालावधीच्या डिपॉझिटवर अर्धा % जास्त व्याज मिळते. म्हणजेच ज्येष्ठांना एकूण एक टक्का फायदा होतो. अशातच सिनियर सिटीजन 10 लाख रुपये पाच वर्षांसाठी जमा करत असतील तर, त्यांच्या खात्यात 14,49,948 एवढी रक्कम जमा होईल. दरम्यान 5 वर्ष कार्यकाळ असलेले एफडीवर कलम 80C अंतर्गत दीड लाखांपर्यंत क्लेम करता येते. सोबतच एफडीवर मिळणारे व्याजदर टॅक्सेबल असतात.

Latest Marathi News | SBI Bank FD Interest Rates 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Bank FD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x