22 November 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा? - Marathi News

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या नेतृत्वाखालील ओडिशा डिस्कॉम कंपनीने स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादार यांना 11,481 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट (NSE: TATAPOWER) वाटप केले आहेत. टाटा पॉवर आणि ओडिशा सरकार यांनी संयुक्तपणे राज्याचे वीज वितरण कार्य हाती घेतल्यापासून अवघ्या तीन वर्षांत स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 8,690 कोटी रुपये आणि डिस्कॉम्सद्वारे 8,690 कोटी रुपये मूल्याचे कामे वाटप करण्यात आले आहे. तसेच या कंपनीने एमएसएमईला 2,791 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. (टाटा पॉवर कंपनी अंश)

आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 418.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ओडिशा डिस्कॉम्स-टीपी सेंट्रल, टीपी सदर्न, टीपी नॉर्दर्न आणि टीपी वेस्टर्न ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड यांनी 6,645 स्थानिक विक्रेते आणि पुरवठादारांसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. या कंपनीने म्हटले आहे की, या कराराच्या माध्यमातून स्थानिक विक्रेत्यांना आणि रहिवाशांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

ओडिशा राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी मीटर रीडिंग, बिलिंग, नेटवर्क मेंटेनन्स आणि इतर कामांसाठी स्थानिक 4347 सेवा पुरवठादाराना लहान कंत्राट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 7560 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे वितरण ट्रान्सफॉर्मर, केबल्स, पोल आणि इतरांसह साहित्य पुरवठा श्रेणीमध्ये डिस्कॉम्सने ऑपरेशनसाठी 3,921 कोटी रुपये मूल्याचे 2,298 कंत्राट वाटप केले आहे.

शुक्रवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 416.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 470.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

Latest Marathi News | Tata Power Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x