22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Post Office Scheme | आता प्रत्येक महिला बनेल मालामाल, 'या' योजनेमुळे तुमचं भाग्य उजळेल, फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | पैशांची बचत करण्याच्या बाबतीत महिला कायाम प्रथम क्रमांकावर असतात. अगदी घर खर्चातल्या पगारातून देखील बचतीसाठीची रक्कम त्या बाजूला काढून ठेवतात. असं करत भरपूर पैसे जमा करतात. भविष्यामध्ये एखाद्या संकटकाळी किंवा कोणत्याही प्रसंगी जास्त पैशांची गरज भासू शकते या विचाराने त्या कायम सेविंग करत असतात. सेविंग तर प्रत्येकजणच करतो परंतु काही महिलांना केंद्र सरकारच्या आणि पोस्टाच्या काही स्कीम बद्दल ठाऊकच नसतं.

पोस्टामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांमधून तुम्ही ठराविक वेळेपर्यंत पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या (महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट) या योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना महिलांसाठी अत्यंत फायद्याची आहे. महिलांना या योजनेमध्ये आपले पैसे गुंतवता येणार आहेत आणि त्यावर चांगलं व्याजदर देखील कमावता येणार आहे.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये असं उघडा स्वतःचं खातं :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्टाच्या अधिकृत बँकेमध्ये जाऊन अकाउंट ओपन करावं लागेल. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करून द्यावी लागेल. तरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल.

स्कीममध्ये किती गुंतवणूक करू शकतो?
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तुम्ही 1 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकता. या स्किमचा मॅच्युरिटी पीरियड दोन वर्षांपर्यंतचा दिला गेला आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणतीही अट नाही. फक्त अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या मुली आपल्या आई-वडिलांच्या मदतीने या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

प्रीमॅच्युअर विड्रॉल :
या योजनेबरोबर वर्षाचे 7.50 % व्याजदराने हिशोब करून अमाउंट खात्यामध्ये जमा केली जाते. सोबतच गुंतवणूकदारासाठी प्रीमॅच्युअर विड्रॉल ही सुविधा देखील देखील दिली गेली आहे. गुंतवलेल्या पैशांमधून खातेदार एक वर्षानंतर 40% अमाऊंट काढू शकतो. त्याचबरोबर लाभार्थ्याचा अचानक मृत्यू झाला तर, नॉमिनी व्यक्ती जमा झालेली रक्कम काढून घेऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे अकाउंट होल्डर कोणत्याही कारणामुळे खात बंद करू शकतो. परंतु त्यांना 7.50% टक्क्यांऐवजी 5.50% टक्के एवढं व्याजदर मिळेल.

Latest Marathi News | Post Office Scheme 10 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x