22 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार, संधी सोडू नका - Marathi News

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी 3 टक्के वाढीसह 76.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने (NSE: SUZLON) पुण्यातील प्रमुख रिअल इस्टेट ऑफीस विकून पुन्हा 5 वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली की, सुझलॉन एनर्जी कंपनीने OE बिझनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेडसोबत वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी एक कन्व्हेयन्स डीड करार केला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जीने आपले कॉर्पोरेट मुख्यालय ‘वन अर्थ’ 440 कोटी रुपये विक्री-आणि-लीजबॅक व्यवहारात OE बिझनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेडला विकले आहे. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 78.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीची ऑर्डरबुक 4GW पर्यंत वाढली आहे.

अनेक सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांकडून जवळपास 1.5GW च्या ऑर्डर्सचे अंतिम निर्णय जाहीर होणे प्रलंबित आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, 2025-26 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीला 2GW पेक्षा जास्त ऑर्डर मिळू शकतात. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 80 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक मजबूत कमाई करून देऊ शकतो.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 21.71 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 84.40 रुपये होती. सुझलॉन एनर्जी स्टॉक S&P BSE 200 इंडेक्सचा भाग आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,02,995.66 कोटी रुपये आहे. मागील तीन महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 56 टक्के वाढला आहे.

गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 86 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारावर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 96 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 220 टक्के, 678 टक्के, 1243 टक्के आणि 2,215 टक्के नफा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | Suzlon Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x