22 November 2024 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची संधी सोडू नका, फायदा घ्या - Marathi News

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच एथर एनर्जी कंपनीचा (Ather Energy LTD IPO) IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी एथर एनर्जीने सोमवारी आपल्या IPO साठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. यामध्ये कंपनीने 3,100 कोटी रुपये किमतीचे फ्रेश शेअर्स इश्यू करून भांडवल उभारणी करणार असल्याची माहिती दिली आहे. (एथर एनर्जी कंपनी अंश)

भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण करणारी एथर एनर्जी ही दुसरी दुचाकी ईव्ही उत्पादक कंपनी ठरणार आहे. यापूर्वी ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. भारतीय बाईक निर्माता Hero MotoCorp द्वारे समर्थन असणारी एथर एनर्जी ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी Ola Electric ची प्रमुख स्पर्धक आहे.

DRHP नुसार एथर एनर्जी कंपनीचे गुंतवणूकदार आणि काही मोठे शेअरधारक IPO मध्ये 22 दशलक्ष शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. GIC व्हेंचर्स ही कंपनी त्यांचा कॅलेडियम इन्व्हेस्टमेंट्स या उपकंपनीद्वारे OFS च्या 47.8 टक्के शेअर्स विकणार आहे. तसेच टायगर ग्लोबल आणि 3 स्टेट्स व्हेंचर्स अनुक्रमे 18.1 टक्के आणि 2.18 टक्के शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत.

तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांनी देखील प्रत्येकी 10 लाख शेअर्स OFS अंतर्गत ठेवले आहेत. DRHP नुसार Hero MotoCorp ही कंपनी 37.2 टक्के भागभांडवलसह एथर एनर्जी कंपनीतील सर्वात मोठी शेअरधारक आहे. त्यानंतर कॅलेडियम इन्व्हेस्टमेंट आणि NIIF यांनी एथर एनर्जी कंपनीचे अनुक्रमे 15.04 टक्के आणि 10.29 टक्के शेअर्स धारण केले आहे. Hero MotoCorp कंपनी या OFS मध्ये सहभागी होणार नाही. एथर एनर्जी कंपनीचे सह-संस्थापक तरुण संजय मेहता आणि स्वप्नील बबनलाल जैन यांची कंपनीत 13.26 टक्के भागीदारी आहे.

अॅक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटीज, नोमुरा फायनान्शियल आणि जेएम फायनान्शिअल या IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम करणार आहेत. एथर एनर्जी कंपनी IPO मधून जमा होणारा निधी आपला भांडवली खर्च आणि संशोधन आणि विकासासाठी खर्च करणार आहे. तसेच कंपनीने महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलर कारखाना उभारणीची योजना आखली आहे. या कंपनीने IPO मध्ये बुक-रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून अॅक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल यांना नियुक्त केले आहे.

Latest Marathi News | IPO GMP Ather Energy LTD 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Ather Energy IPO(1)IPO GMP(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x