19 April 2025 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

EPFO Pension Money | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची अपडेट, मिळणार 7 प्रकारच्या पेन्शन - Marathi News

EPFO Pension Money

EPFO Pension Money | ईपीएफओ खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. ईपीएफओच्या माध्यमातून तुम्हाला चक्क सात प्रकारच्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या व्यक्तीने ईपीएफओमध्ये सलग दहा वर्ष सातत्याने गुंतवणूक केली तरच तो पेन्शन मिळण्यास पात्र होतो. अशातच नोकरदारांना ईपीएफओकडून 58 व्या वर्षी पेन्शन सुरू होते.

ईपीएफओमध्ये आणखीन काही तरतुदी दिल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये खातेधारकाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनचा लाभ घेता येऊ शकतो. तुम्ही सुद्धा ईपीएफओमध्ये खातं उघडलं असेल आणि तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.

1. अपंगत्व निवृत्ती वेतन :
ईपीएफओ अंतर्गत असलेल्या पेन्शनच्या सात प्रकारांमधील अपंगत्व निवृत्ती वेतन ही सेवा कायमचे किंवा सेवेदरम्यान आलेल्या अपंगत्वासाठी दिली जाते. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही अट नाही आणि दहा वर्ष पेन्शन फंडमध्ये योगदान देखील नाही. परंतु तुम्ही ईपीएसमध्ये दोन वर्षांसाठी योगदान दिले असेल तर, तुम्ही या पेन्शनवर हक्क दाखवू शकता.

2. अर्ली पेन्शन :
ईपीएफओने अर्ली पेन्शनची सुविधा करून ठेवली आहे. सहसा ईपीएफओ अंतर्गत वयाच्या 58 व्या वर्षी व्यक्ती पेन्शन घेण्यासाठी पात्र होतं. परंतु अर्ली पेन्शनमध्ये तुम्ही 58 वय पूर्ण होण्याआधी देखील म्हणजे ते 50 व्या वर्षी पैसे काढू शकता. अर्ली पेशंटमध्ये सदस्यांना 4 टक्के पेन्शन कमी दिली जाते. म्हणजेच 58 व्या वर्षी मिळणारी 10,000 रुपये पेन्शन 57 व्या वर्षी सुरू करायची असेल तर, दरमहा 9,600 एवढी पेन्शन मिळेल. सोबतच 56 व्या वर्षी 8% ने कमी झाल्यावर 9,200 रुपये मिळतील.

3. निवृत्ती वेतन :
ईपीएफओच्या या पेन्शन प्रकारामध्ये तुम्ही 58 वर्षापेक्षा 60 वर्षामध्ये पेन्शन सुरू करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी चार टक्के वाढवून मिळतील. त्याचबरोबर ही पेन्शन सुविधा तुमच्या योगदानावर अवलंबून असते.

4. विधवा किंवा बाल निवृत्ती वेतन :
पेन्शनच्या या प्रकारामध्ये ईपीएफओ खातेदारक अचानक मृत्युमुखी पडला तर, त्याच्या 25 वर्षापेक्षा कमी असलेल्या दोन मुलांना, सोबतच पत्नीला पेन्शन मिळू शकते. एवढेच नाही तर खातेधारकाला तिसरा मुलगा असेल तर, दुसऱ्या मुलाचं 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या मुलाला पेन्शन लागू होते.

5. नॉमिनी पेन्शन :
ईपीएफओ खातेधारकाला पत्नी किंवा मुलं नसतील तर, त्याने केलेल्या नॉमिनीला पेन्शनची रक्कम मिळू शकते. तुम्ही यामध्ये तुमच्या आई-वडिलांना देखील नॉमिनी करू शकता. यामध्ये दोन व्यक्तींना योग्य शेअरनुसार रक्कम मिळत राहील.

6. आश्रित पालक पेन्शन :
आश्रित पालक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 10D हा फॉर्म भरून द्यावा लागेल. यामध्ये एकल खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वडिलांना आणि वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या आईला मरेपर्यंत पेन्शन मिळणार.

7. अनाथ पेन्शन :
अनाथ पेन्शनमध्ये ईपीएफओ सबस्क्राईब आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच दोघांचाही मृत्यू झाला तर, दोघांच्या 25 वर्षापेक्षा कमी असलेल्या दोन मुलांना 25 वय पूर्ण होईपर्यंत पेन्शन मिळत राहणार. मुलांचं एकदा 25 वय पूर्ण झालं की, त्यांना मिळणारी ही पेन्शन बंद होणार.

Latest Marathi News | EPFO Pension Money 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या