22 November 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Rama Steel Share Price | श्रीमंत करणार हा 15 रुपयाचा शेअर! 15 दिवसात 53% कमाई झाली, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • मागील 15 दिवसात 53% परतावा दिला
  • मागील 5 दिवसात 21% परतावा दिला
  • संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची योजना
  • Onyx Renewable या कंपनीसोबत करार
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.47 रुपये किमतीवर पोहचले होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर 14.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 17.51 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.91 रुपये होती. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)

मागील 15 दिवसात 53% परतावा दिला
रामा स्टील ट्युब्स कंपनीने 2016 पासून आपल्या गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 2.65 टक्के वाढीसह 15.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 10.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 दिवसात 21% परतावा दिला
11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.47 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 21 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2315 कोटी रुपये आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीने 2016 पासून आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. या स्मॉलकॅप कंपनीने मार्च 2016 मध्ये 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर जानेवारी 2023 मध्ये कंपनीने पुन्हा 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. मार्च 2024 मध्ये या कंपनीने 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची योजना
नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची योजना जाहीर केली आहे. संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी या कंपनीने रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला कॉर्पोरेट मंत्रालयाकडून 2 सप्टेंबर 2024 रोजी निगमन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

Onyx Renewable या कंपनीसोबत करार
याशिवाय रामा स्टील ट्यूब्स कंपनीने Onyx Renewable या कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी सोलर प्रकल्पांसाठी Onyx Renewable कंपनीला स्टील स्ट्रक्चर्स आणि सिंगल अॅक्सिस ट्रॅकर्स पुरवणार आहे.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x