23 November 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

My EPF Money | ईपीएफ विड्रॉल करण्याचे नियम झाले सोपे, जाणून घ्या कोणत्या कारणांसाठी पैसे काढू शकता - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • EPF काढण्यासाठी काय असावी पात्रता?
  • किती वर्षांसाठी EPFO सदस्य असायला हवा?
  • EPF जाणून घेण्याची मिस कॉल पद्धत :
  • अशा पद्धतीने काढा पीएफ खात्यातून पैसे :
  • EPF बैलेंससाठी उमंग ॲप :
My EPF Money

My EPF Money | पेन्शन कर्त्यांसाठी ईपीएफओ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीएफमध्ये पैसे जमा करून रिटायरमेंटनंतरचं आयुष्य आनंदमय बनवू शकता. परंतु काही कारणांमुळे रिटायरमेंटआधीच पैसे काढण्याची म्हणजे पीएफ मोडण्याची गरज भासू शकते. तुम्ही कोण कोणत्या वेळी पीएफमधील पैसे काढू शकता जाणून घेऊ.

EPF काढण्यासाठी काय असावी पात्रता?
पीएफमधील पैसे काढण्यासाठी दिलेल्या तरतुदीनुसार थोड्या प्रमाणात किंवा पूर्ण रक्कम तुम्ही काढून घेऊ शकता. विशेष म्हणजे ज्यावेळी कर्मचारी दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस बेरोजगार राहिला असेल. त्याच्याकडे कमाईचं कोणतही साधन नसेल किंवा त्याच्या घरात कोणत्याच बाजूने पैसे येत नसतील तर, आपली गरज भागवण्यासाठी तो पीएफमधून पैसे काढू शकतो.

किती वर्षांसाठी EPFO सदस्य असायला हवा?
खात्यामधून पैसे काढण्यासाठी कर्मचारी पीएफ खात्याचा चार ते सात वर्षांपर्यंत सदस्य राहिलेला असला पाहिजे. म्हणजेच सात वर्षांपर्यंत पीएफमध्ये पैसे जमा करत राहिले पाहिजे किंवा एखाद्या कंपनीमध्ये सतत सात वर्ष काम केलेले पाहिजे. अडचणींबद्दल सांगायचं झालं तर, घराची डागडुजी करण्यासाठी, नवं घर घेण्यासाठी, मुलांचं लग्न करण्यासाठी आणि घराचं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही पैसे काढू शकता.

EPF जाणून घेण्याची मिस कॉल पद्धत :
खातेधारकाचा नंबर युएएनला जोडला गेलेला असेल तर तुमच्या रजिस्टर नंबरने 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्या. मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला ईपीएफओ खात्यामधील बॅलेन्स दाखवण्यासाठीचा एक ऑप्शन दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर कर्मचारी ऑप्शनवर जाऊन सदस्य पासबुक या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफबाबत सर्व काही कॅल्क्युलेशन पाहायला मिळेल.

अशा पद्धतीने काढा पीएफ खात्यातून पैसे :
घर खरेदी, होम लोन, लग्नाचा खर्च सोबतच कर्मचाऱ्याचं दोन महिने वेतन बंद झाल्यास कर्मचारी खात्यामधून पैसे काढू शकतो. पीएफमधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळ यूनिवर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN असायलाच हवा. त्यानंतर तुम्हाला ओळखपत्र, बँकेचे सर्व डिटेल्स आणि कॅन्सल चेकची गरज भासते.

त्यानंतर सर्वप्रथम ईपीएफओ प्रोफाइलमध्ये जाऊन लॉगिन करा. लगेचच तुमच्या नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी तुम्हाला कॅप्चा कोडने दर्शवायचा आहे. त्यानंतर डाव्या बाजूस ऑनलाइन ऑप्शन दिला असेल त्यावर जाऊन ड्रॉप डाऊन मेनूच्या सहाय्याने क्लेम बटनावर क्लिक करा.

पुढे सर्व गोष्टी व्यवस्थित पडताळून तुमच्या चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. त्याआधी दिल्या गेलेल्या तरतुदी पूर्ण करा. ज्यामध्ये तुम्ही रक्कम का काढताय याचं कारण विचारलं जातं. तसं पाहायला गेलं तर, रिटायरमेंटपर्यंत तुम्ही पीएफच्या पैशांना हात देखील लावला नाही पाहिजे. परंतु काही गरजू कारणांमुळे तुम्ही हे पैसे अशा पद्धतीने काढू शकता.

EPF बैलेंससाठी उमंग ॲप :
उमंग ॲप्लीकेशनद्वारे तुम्ही स्मार्टफोनच्या सहाय्याने पीएफ बैलेंस चेक करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला एकाचवेळी अनेक सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. पुढे रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही स्वतःचा नंबर टाकून ईपीएफ पासबुक पाहू शकता आणि ट्रॅक देखील करू शकता.

Latest Marathi News | My EPF Money 13 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x