25 November 2024 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Post Office Scheme | हि योजना दरमहा देईल 40,100 रूपये; शिवाय व्याजाने कमवा 12 लाखांहून अधिक पैसे - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • स्कीमचा लाभ घेण्यासाठी काय योग्यता असावी
  • जाणून घ्या स्कीमचे फीचर्स
  • किती खाते उघडू शकता?
  • सिंगल अकाउंट कॅल्क्युलेशन
  • दोन वेगवेगळ्या खात्यांचं कॅल्क्युलेशन
Post Office Scheme

Post Office Scheme | ज्येष्ठांसाठी फायद्याच्या ठरणाऱ्या अनेक योजना पोस्टामार्फत राबवल्या जातात. रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवता यावी आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी ती वापरावी. म्हणजेच काय तर, उतार वयामध्ये आपली काहीतरी जमापुंजी असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. परंतु पैसे गुंतवण्यासाठी सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सुरक्षिततेचा.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका मंथली इनकमल स्कीम बद्दल सांगणार आहोत. या स्कीमच नाव ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ असं असून ही स्कीम तुम्हाला चांगली सुरक्षितता आणि टॅक्स बेनिफिट्स प्रोव्हाइड करते. या स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे दिलेल्या मॅच्युरिटी कार्यकाळापर्यंत तुम्ही एकही पैसा खात्यामधून काढला नाही तर, फक्त व्याजाचेच तुम्ही 12 लाख रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. त्यामुळे निवृत्तीनंतरचा काळ अल्हाददायक जाण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया या स्कीमबद्दल सर्व काही.

स्कीमचा लाभ घेण्यासाठी काय योग्यता असावी :
ज्या कर्मचाऱ्यांनी VRS म्हणजेच वॉलेंटियरी रिटायरमेंट या स्कीमची निवड केली असेल तर ते कर्मचारी या स्कीमचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. म्हणजेच 55 ते 60 वयोगटातील कर्मचारी या स्कीमचा पुरेपूर लाभ घेण्यास पात्र आहेत. त्याचबरोबर 60 वय वर्ष असलेले रिटायर्ड डिफेन्स कर्मचारी देखील या योजनेचा भाग होऊ शकतात. परंतु, NRI आणि HUF या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.

जाणून घ्या स्कीमचे फीचर्स :
सीनियर सिटीजन सेविंग स्कीमबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकता. यामध्ये मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षांचा असून वार्षिक व्याजदर 8.2% असणार आहे. अधिक फायद्याची गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांवर मिळणार टॅक्स सूट. एवढंच नाही तर नॉमिनेशन आणि प्री-मॅच्युअरची सुविधा देखील आहे उपलब्ध.

किती खाते उघडू शकता?
या स्कीममध्ये तुम्ही सिंगल आणि जॉईंट दोन्हीही प्रकारचे अकाउंट खोलू शकता. जर पती-पत्नी मिळून दोन वेगवेगळ्या अकाउंट ठेवत असतील तर, त्याची देखील सुविधा दिली गेली आहे. पत्नीसह उघडलेल्या जॉईंट अकाउंटमध्ये 30 लाख तर, दोन वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये 60 लाख रुपये जमा होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे 3 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर आणखीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हे अकाउंट तीन वर्षांसाठी पुढे वाढवू शकता.

सिंगल अकाउंट कॅल्क्युलेशन
1. मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्ष
2. दिला गेलेला व्याजदर : 8.2%
3. अकाउंटमध्ये जास्तीत जास्त जमा करावयाची रक्कम : 30 लाख
4. तीमाही व्याज : 60,150 रूपये
5. महिन्याचं व्याज : 20,050
6. वार्षिक व्याज : 2,40,600 रूपये
7. मॅच्युरिटी पिरियडपर्यंत जमा झालेलं व्याजदर : 12,03,000
8. एकूण परतावा : 42,03,000 लाख रुपये.

दोन वेगवेगळ्या खात्यांचं कॅल्क्युलेशन
1. दोन वेगवेगळ्या अकाउंटमध्ये जमा करण्याची रक्कम : 60 लाख
2. मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्ष
3. वार्षिक व्याजदर : 8.2%
4. महिन्याचं व्याजदर : 40,100 रूपये
5. तीनाही व्याजदर : 1,20, 300 रूपये
6. वार्षिक व्याजदर : 2,81,200 रूपये
7. पाच वर्षांमधील एकूण व्याजदर : 24,06,000
8. एकूण परतावा : 84,06,000

Latest Marathi News | Post Office Scheme SCSS Benefits 16 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x