22 November 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Reliance Power Share Price | 31 रुपयाचा शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, 5 वर्षात 829% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Reliance Power Share Price – NSE: RELIANCEPOWER – रिलायन्स पॉवर कंपनी अंश
  • रिलायन्स पॉवर कंपनी – नवीन करार – Reliance Power Share
  • कंपनीने 500 MW क्षमतेचा प्रोजेक्ट मिळवला – Reliance Power Share Price Today
  • रिलायन्स पॉवर शेअर्स BSE स्मॉलकॅप इंडेक्सचा भाग
  • मागील 5 वर्षात 829% परतावा दिला – Reliance Power Share Price Target 2025
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के वाढीसह 31.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने (NSE: RELIANCEPOWER) सोमवारी माहिती दिली की, त्यानी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ई-रिव्हर्स ऑक्शन अंतर्गत 500 MW क्षमतेचा बॅटरी स्टोरेज कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. हा प्रकल्प 11 सप्टेंबर 2024 रोजी SECI द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जा साठवण क्षमता वाढविण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)

रिलायन्स पॉवर कंपनी – नवीन करार
या कराराअंतर्गत एकूण 1,000 मेगावॅट क्षमतेच्या स्टँडअलोन BESS युनिट्सची स्थापना केली जाणार आहे. हा प्रकल्प टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेअंतर्गत “On Demand” वापरासाठी बिल्ड-ओन-ऑपरेट तत्त्वावर दिला जाणार आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.22 टक्के वाढीसह 31.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीने 500 MW क्षमतेचा प्रोजेक्ट मिळवला
रिलायन्स पॉवर कंपनीने 1000MW क्षमतेपैकी 500 MW क्षमतेचा प्रोजेक्ट मिळवला आहे. यासह कंपनीने अक्षय ऊर्जा आणि वीज साठवण क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्पर्धात्मक बोलीमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीने 3.81999 लाख प्रति MW प्रति महिना दराची बोली लावली होती. हा नवीन टॅरिफ बेंचमार्क भारतातील 400 KV स्तरावरील BESS निविदांसाठी आजपर्यंतच्या सर्वात कमी दरांपैकी एक मानला जात आहे. या प्रकल्पासाठीचा वितरण बिंदू फतेहगढ राजस्थान येथे असेल.

रिलायन्स पॉवर शेअर्स BSE स्मॉलकॅप इंडेक्सचा भाग
पूर्ण क्षमतेसाठी नियोजित कमिशनिंग तारीख BESPA कराराच्या तारखेपासून 24 महिने निश्चित करण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेत ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील अनेक प्रमुख कंपन्या सामील झाल्या होत्या. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सचा भाग आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 1 आणि 2 आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 5.45 टक्के आणि 4 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षात 829% परतावा दिला
मागील 1 आणि 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत अनुक्रमे 0.22 टक्के आणि 41.53 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 63.30 टक्के, 69.76 टक्के, 123 टक्के आणि 829.38 टक्के नफा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | Reliance Power Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x