22 November 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, सर्वात मोठा व्याजदर, बचतीवर मिळेल लाखोत परतावा - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme – Mahila Samman Savings Certificate
  • गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?
  • योजनेमध्ये आहे ही देखील सुविधा
  • असं उघडा अकाउंट – Mahila Samman Yojana
Post Office Scheme

Post Office Scheme | 2023 साली केंद्र सरकारने महिलांच्या अत्यंत फायद्याची योजना सुरू केली आहे. महिलांच्या सशक्तिकरण्यासाठी सोबतच प्रत्येक महिला आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहण्यासाठी केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवतच असतात. यातीलच एक ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना अनेक महिलांसाठी अत्यंत फायद्याची ठरली. ही योजना सामान्यांपासून ते गरीब प्रवर्गातील महिलांसाठी देखील आहे. त्याचबरोबर तुम्ही मुलगी लहान असतानाच तिच्यासाठी ही योजना सुरू करू शकता.

परंतु ही योजना फक्त दोन वर्षांचीच आहे. 2025 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.. या योजनेमध्ये अनेक महिलांना चांगला परतावा मिळाला आहे. जर तुम्हाला सुद्धा या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल आणि वर्ष संपायच्या आत फॉर्म भरायचा असेल तर, आम्ही सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा आणि योजनेचा लाभ घ्या.

गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?
या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी हजार आणि जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकता. या योजनेचा तुम्हाला 7.5% व्याजदराने चक्रवाढ व्याज दिले जाते. समजा एखादी महिला आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये 50 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर, दोन वर्षांच्या कार्यकाळात व्याजदरानुसार 8011 रुपये जमा होतात. म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा एकूण परतावा 58,011 रुपये इतका मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही 1 लाखांची गुंतवणूक करत असाल तर, व्याजदराच्या हिशोबाने 16,022 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच एकूण रक्कम 1,16,022 एवढे पैसे तुम्हाला परत मिळतील.

योजनेमध्ये आहे ही देखील सुविधा :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तुम्ही मुदतीआधी 40% रक्कम काढून घेऊ शकता. दोन वर्षांच्या योजनेच्या कार्यकाळामध्ये एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही 40% रक्कम काढू शकता. उदाहरणार्थ एखाद्या महिलेने या योजनेमध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, ती यापैकी तब्बल 80 हजार रुपये काढून घेऊ शकते.

असं उघडा अकाउंट :
महिला सन्मानसेविंग सर्टिफिकेट या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. 18 वर्षापेक्षा अधिक वय असेल तर फॉर्म भरला जाणार नाही. 18 वर्षे कमी असल्यामुळे मुलीचा फॉर्म तिचे आई-वडील भरू शकतात. ही योजना सुरू करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज दोन फोटो हे तीन कागदपत्र लागणार आहेत.

Latest Marathi News | Post Office Scheme Mahila Sanman Saving Certificate 17 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x