23 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News

Highlights:

  • Reliance Infra Share PriceNSE: RelianceInfra – रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश
  • मागील साडेचार वर्षांत 2400% परतावा दिला
  • कंपनी संचालक मंडळाची बैठक
  • मागील 2 महिन्यांत 23% परतावा दिला
Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: RelianceInfra) शेअर्स 7 टक्के वाढीसह 232.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)

मागील साडेचार वर्षांत 2400% परतावा दिला
मागील साडेचार वर्षांत रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 143.70 रुपये होती. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 215.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 20.00 टक्के वाढीसह 282.73 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

कंपनी संचालक मंडळाची बैठक
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 19 सप्टेंबर रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणी करण्याच्या प्रस्तावावर विचार करतील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी इक्विटी शेअर्स जारी करून, इक्विटी लिंक्ड सिक्युरिटीज किंवा वॉरंट इक्विटीमध्ये रूपांतरित कडून भांडवल उभारणी करू शकते. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 2 महिन्यांत 23% परतावा दिला
17 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 232.80 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्के वाढली आहे. मागील 2 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 23 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9100 कोटी रुपये आहे.

Latest Marathi News | Reliance Infra Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x