23 November 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापन कंपनी SBI म्युच्युअल फंडने नवीन NFO लॉन्च केल्याची घोषणा केली. SBI म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेचे नाव SBI निफ्टी 500 इंडेक्स फंड असून ही योजना 17 सप्टेंबर 2024 ते 24 सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी ओपन असेल. हा म्युचुअल फंड एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे, जी फक्त निफ्टी 500 इंडेक्समध्ये गुंतवणूक करते.

निफ्टी 500 इंडेक्समध्ये भारतातील टॉप 500 कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. हा म्युचुअल फंड यामधून चांगले शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करतो. ही म्युचुअल फंड योजना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 95 टक्के आणि कमाल 100 टक्के गुंतवणूक निफ्टी 500 इंडेक्स शेअर्समध्ये करणार आहे. तसेच उर्वरित 5 टक्के गुंतवणूक सरकारी सिक्युरिटीजमध्ये करणार आहे.

तुम्ही SBI निफ्टी 500 इंडेक्स फंडात किमान 5000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत कोणताही लॉक-इन कालावधी नाही. SBI निफ्टी 500 इंडेक्स फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन राहून अंतर्निहित निर्देशांकाद्वारे दर्शविलेल्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी सुसंगत परतावा प्रदान करणे आहे.

तथापि, या म्युचुअल फंड योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल याची खात्री नाही, करत म्युचुअल फंड गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. SBI निफ्टी 500 इंडेक्स फंड आपल्या गुंतवणूकदारांना भारतातील टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड सर्व प्रकारच्या मार्केट कॅपमध्ये गुंतवणूक करून वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करतो.

Latest Marathi News | Mutual Fund NFO 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x