16 April 2025 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Kangana Ranaut | पाकिस्तानमध्ये देखील बॉलीवूड स्टार 'कंगना रनौतची' हवा, महिलेने काढलाय हुबेहूब कंगनासारखा आवाज

Kangana Ranaut

Kangana Ranaut | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या संसदेमध्ये व्यस्त असल्याची पाहायला मिळते. यादरम्यान कंगनाचे वादग्रस्त विधान आणि समोरील व्यक्तीला टोला लगावण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल होत असतात. कंगनाने बॉलीवूड सिनेसृष्टीला सध्या तरी पूर्णविराम दिल्याचा दिसून येत आहे. तरीसुद्धा कंगनाच्या अभिनयाची तितकीच क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल
त्याचबरोबर पाकिस्तानमधील कोणत्यातरी शो दरम्यानचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातला नाही तर पाकिस्तानमधील आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमधील महिला प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना हुबेहूब कंगनाचा आवाज काढत आहे. तिच्या या व्हिडिओला अनेकांनी डोक्यावर धरलं असून अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

कंगनासारखा लूक क्रिएट करण्याचा प्रयत्न
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी महिलेने कंगनासारखा लूक क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दुसरी कोणती महिला नसून कंगनाच उभी आहे की काय असं अनेकांना वाटलं आहे. महिलेने कंगनाप्रमाणेच कुरळे केस आणि काळ्या रंगाच्या साडीमध्ये स्टँडअप कॉमेडी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

बॉलीवूड सिनेसृष्टीला जबरदस्त सिनेमे दिले
कंगनाबद्दल सांगायचं झालं तर, कंगनाने आतापर्यंत बॉलीवूड सिनेसृष्टीला जबरदस्त सिनेमे दिले आहेत. तिच्या प्रत्येक सिनेमामधील सर्वच गाणी सुपर डुपर हिट ठरली आहेत. दरम्यान राजकारणी जीवन जगत असताना कंगनाने काही दिवसांआधी एक दावा केला होता यामध्ये तिच्या बोलण्यातून असं आढळून आलंय की, बॉलीवूडमधील फेमस कलाकार डिनरसाठी बोलावतात आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट आपण ऐकली नाही की, आपल्याला त्याची चांगलीच किंमत मोजावी लागते. कंगनाच्या तोंडून असं ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Latest Marathi News | Kangana Ranaut mimicked by Pakistani woman 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kangana Ranaut(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या