20 September 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News

Highlights:

  • Salman Khan
  • अशी मिळाली सलीम खान यांना धमकी :
  • खूप आधीपासूनच सलमानच्या जीवावर उठलाय गॅंगस्टर बिश्नोई :
Salman Khan

Salman Khan | रिपोर्टनुसार बॉलीवूड ॲक्टर सलमान खान याच्या घराबाहेर काही महिन्यांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोइकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा सलमान खानच्या वडिलांना म्हणजेच सलीम खान यांना गँगस्टरकडून थरारक धमकी मिळाली आहे. ही धमकी फोनवर नाही, चिठ्ठीवर नाही तर डायरेक्ट समोरून आली आहे. धमकी ऐकल्याबरोबर सलीम खान अत्यंत घाबरून गेले आहेत. सोबतच त्यांनी पोलीस चौकीमध्ये देखील धाव घेतल्याचं रिपोर्टकडून समजतंय.

सलमानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगनंतर त्याने सिक्युरिटीचा कडक बंदोबस्त केला आहे. त्यामुळे सलीम खान यांना थेट बाहेर गाठून ही धमकी देण्यात आली आहे. या थरारक घटना घडवून आणणाऱ्या दोन आरोपींचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिपोर्टनुसार वायरल झालेल्या फोटोमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष पाहायला मिळत आहेत. यामध्ये पुरुष स्कुटी चालवत आहे तर, त्याच्या मागे बसलेल्या महिलेने बुरखा घातलेला आहे. यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला पाहायला मिळतोय.

अशी मिळाली सलीम खान यांना धमकी :
माध्यमांच्या माहितीनुसार सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर निघाले होते. तेव्हा त्यांना ही भयानक धमकी देण्यात आली. वॉक करत असताना सलीम खान एका बेंचवर रिलॅक्स होण्यासाठी बसले होते. त्यादरम्यान गॅलेक्सीकडून बँडस्टँडकडे एक कपल स्कुटीवरून जात होते.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार स्कुटीने पुन्हा यूटर्न घेतलाआणि सलीम खान यांच्याजवळ येऊन महिला म्हणाली,’ लॉरेंस बिश्नोई को भेजू क्या?’. असं बोलून झाल्यानंतर दोघेही स्कुटीवरून सुसाट पुढे निघून गेले. दोघांच्या स्कुटीचा नंबर 7444 असा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर सदर घटनेला घाबरून सलीम यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांकडून या घटनेची तपासणी सुरू आहे. रिपोर्टकडून असं देखील समजतय की ही घटना 18 सप्टेंबरला घडली आहे.

Salman Khan Father Salim Khan Gets Threats From Bishnoi Gang

खूप आधीपासूनच सलमानच्या जीवावर उठलाय गॅंगस्टर बिश्नोई :
गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा अनेक वर्षांपासून सलमानच्या जीवावर उठला आहे. सलमानच्या काळवीट मारण्याच्या प्रकरणातून बिश्नोइ समुदाय सलमानवर प्रचंड नाराज आहे. गँगस्टरने दिवसाढवळ्या आणि एका इंटरव्यूमध्ये सलमान खानला धमकी दिली होती. यामध्ये सलमानने माफी मागावी किंवा शिक्षा भोगायला तयार राहावं अशा पद्धतीचे वक्तव्य लॉरेंसने केलं होतं. अजून या प्रकरणाबद्दल काही अपडेट समोर आली नाहीये. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सलमानचे चाहते उत्सुक आहेत.

Latest Marathi News | Salman Khan Father Salim Khan Gets Threats Again From Bishnoi Gang 20 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salman Khan(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x