22 November 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News

Highlights:

  • Credit Card
  • क्रेडिट कार्ड युटीलायजेशन रेश्यो :
  • क्रेडिट कार्डचे लिमिट :
  • व्याज मुक्त कालावधी :
  • क्रेडिट स्कोर :
  • कॅश काढणे :
  • मिनिमम ड्यू आणि टोटल ड्यू :
Credit Card

Credit Card | क्रेडिट कार्ड वापरणे ही तरुण पिढीसाठी एक मजेशीर बाब बनली आहे. अनेक तरुण-तरुणी शॉपिंग ॲपवरून काही ना काही वस्तू मागवत असतात. ऑनलाइन शॉपिंग केल्यामुळे मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे. काहीजण क्रेडिट कार्ड घेतात. परंतु या कार्डचा व्यवस्थित वापर कसा करावा सोबतच काही गोष्टी त्यांना माहीतच नसतात. आज आम्ही क्रेडिट कार्ड घेणाऱ्या व्यक्तींना काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्या त्यांना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग पाहू.

क्रेडिट कार्ड युटीलायजेशन रेश्यो :
क्रेडिट कार्ड युटीलायजेशनची एक लिमिट असते म्हणजे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी एक प्रमाण दिले जाते. तुम्ही हे प्रमाण 30% पेक्षा कमी ठेवले पाहिजे. समजा तुमचं क्रेडिट प्रमाण 10 लाखांपर्यंत आहे तर, 3 लाखापेक्षा अधिक खर्च होणार नाही याची काळजी तुम्ही घेणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचे लिमिट :
प्रत्येक क्रेडिट कार्डची वेगवेगळी लिमिट असते. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड दिलेल्या प्रमाणामध्येच वापरले पाहिजे. समजा तुमच्या क्रेडिट कार्डचे प्रमाण 5 लाखांपर्यंत आहे तर, तुम्ही 5 लाखांपेक्षा अधिक खर्च किंवा अधिक खरेदी करू शकत नाही.

व्याज मुक्त कालावधी :
समजा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी केली असेल तर, 45 दिवसांपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळते. ज्यामुळे तुम्हाला फायदा अनुभवता येऊ शकतो. परंतु ही लिमिट संपल्यानंतर तुमचं व्याज पुन्हा सुरू होतं.

क्रेडिट स्कोर :
तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची असेल तर, सगळं पेमेंट वेळच्यावेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही व्यवस्थित आणि वेळोवेळी पेमेंट करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर उच्चांक गाठतो. ज्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डची चांगली लिमिट मिळू शकते. उदाहरणार्थ तुमची क्रेडिट सीमा 5 लाखांपर्यंत आहे आणि तुमचं सर्व पेमेंट अगदी वेळच्यावेळी असेल तर, तुमची क्रेडिट लिमट 7.5 लाखांपर्यंत जाऊ शकते.

कॅश काढणे :
समजा तुम्ही क्रेडिट कार्डने कॅश काढत असाल परंतु असं करू नये. क्रेडिट कार्डने कॅश काढल्यामुळे तुम्हाला सामान्य व्याजापेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागते. यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो.

मिनिमम ड्यू आणि टोटल ड्यू :
समजा तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड प्राप्त झाले आहे आणि तुमच्यासमोर ठराविक रक्कम भरा आणि पूर्ण रक्कम भरा असे दोन पर्याय आले तर, नेहमी पूर्ण रक्कम भरण्याचा पर्याय निवडा. जर तुम्ही ठराविक रक्कमेचा पर्याय निवडला तर तुमच्याकडून व्याज आकारण्यात येईल.

Latest Marathi News | Credit Card Facts need to know 20 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x