21 September 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या तारखेला DA वाढून एकूण पगारात वाढ होणार - Marathi News Bollywood News | स्त्री 2 च्या कोरिओग्राफरला सुनवली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वाचा कारण - Marathi News Triumph Speed T4 Vs Royal Enfield Classic 350 | तरुणांनो, ट्रायम्फ की रॉयल एनफील्ड, किंमत, इंजिन, फीचर्स पाहून ठरवा CIBIL Score | पगारदारांनी या 7 चुका टाळाव्या, अन्यथा CIBIL स्कोअर खराब होऊन कोणतंही कर्ज मिळत नाही - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News SBI Mutual Fund | 4 पटीने पैसा वाढेल, SBI फंडाच्या खास योजना देतील मोठा परतावा, फायदा घ्या - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, यापूर्वी 1100% परतावा दिला - Marathi News
x

BEL Share Price | PSU कंपनीबाबत अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये दिला 47% परतावा, स्टॉक पुढेही मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – बीईएल कंपनी अंश
  • कंपनीची ऑर्डर बुक मजबूत – BEL Share
  • मागील 5 वर्षात 685% परतावा दिला – NSE:BEL
BEL Share Price

BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स (NSE: BEL) सातत्याने विक्रीच्या दबावत ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)

गुरुवारी बीईएल स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 267.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 3.57 टक्क्यांच्या घसरणीसह 272.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 277.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीची ऑर्डर बुक मजबूत
बीईएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. बीईएल कंपनीचे शेअर्स सध्या सुधारण्याच्या टप्प्यात आहेत. 10 जुलै 2024 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 340.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्क्यांनी खाली आला आहे. मागील 6 महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 95 टक्के वाढली आहे.

मागील 5 वर्षात 685% परतावा दिला
मागील दोन वर्षांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 146 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या 3 वर्षांत बीईएल स्टॉक तब्बल 300 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 685 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बीईएल ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. बीईएल ही कंपनी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि प्रणालींचे उत्पादन करते.

Latest Marathi News | BEL Share Price 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x