22 November 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, फक्त व्याजानेच कमवाल 4 लाख रुपये, पैशाने पैसा वाढवा - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • 1 ते 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर किती टक्के व्याज मिळते
  • 6 महिने होईपर्यंत पैसे काढले जाऊ शकत नाही
  • 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटमध्ये 10 लाख गुंतवल्यास एवढी रक्कम मिळेल
Post Office Scheme

Post Office Scheme | केंद्र सरकारच्या अंतर्गत पोस्टाच्या अनेक योजना पार पडतात. पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू असणाऱ्या योजनांचा अनेक व्यक्ती लाभ घेतात. काही कमर्शियल बँका त्यांच्या ग्राहकांना सेविंग स्कीम म्हणजेच एफडीसारख्या योजना ऑफर करतात. अगदी त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना TD म्हणजेच ‘टाईम डिपॉझिट’ नावाची स्कीम ऑफर करतात. ही स्कीम तिच्या ठराविक काळापर्यंत मॅच्युअर होते. सध्याच्या घडीला पोस्टाने चार वेगवेगळ्या टाईम डिपॉझिट स्कीम ऑफर केल्या आहेत.

1 ते 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर किती टक्के व्याज मिळते :
तुम्ही या स्कीममध्ये फक्त 1000 कृपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर या स्कीम मध्येतुम्ही तुम्हाला हवे तितके पैसे गुंतवू शकता. म्हणजेच या स्कीमच्या गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये. पोस्टाच्या टाईम डिपॉझिटवर ग्राहकांना पाच वर्षासाठी 7.5 % व्याजदर मिळते. तर, एका वर्षासाठी 6.7%, 2 वर्षांसाठी 7.0% आणि 3 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर 7.1% व्याजदर मिळते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्सद्वारे कलम 80C अंतर्गत पाच वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर आणखीन लाभ मिळतो.

6 महिने होईपर्यंत पैसे काढले जाऊ शकत नाही :
पोस्टाची टाईम डिपॉझिट स्कीम मॅच्युअर होईपर्यंत किंवा मॅच्युअर होण्याआधीच पुढे ढकलण्यासाठी वाढवली जाऊ शकते. जर तुम्हाला टाईम डिपॉझिटला एका वर्षासाठी वाढवायचं असेल तर, 6 महिन्यांआधीच वाढवावी लागेल. तसेच दोन वर्षांसाठी वाढवायची असेल तर, 12 महिन्यांआधीच वाढवावी लागेल. परंतु पोस्टाची टाईम डिपॉझिट स्कीम तुम्ही सहा महिने होण्याआधीच काढू शकत नाही.

5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटमध्ये 10 लाख गुंतवल्यास एवढी रक्कम मिळेल :
इतर बँकांपेक्षा पोस्टाच्या टाईम डिपॉझिटवर मिळणारे व्याज जास्त आहे. म्हणजेच, 5 वर्षांच्या TD वर 10 लाख रुपये जमा करत असाल तर, पाच वर्षानंतर तुम्हाला 14,49,949 एवढी रक्कम व्याजासकट मिळेल. यामधील व्याजाचीच रक्कम 4,49,949 रुपये एवढी असेल.

Latest Marathi News | Post Office Scheme TD Interest 22 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x