23 September 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून जिओ फायनान्शियल शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 500 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार Post Office Interest Rate | पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या 1 ते 30 लाखाच्या बचतीवरवर मिळणारी रक्कम - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 250 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News Patel Engineering Share Price | 60 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL शेअर तेजीत धावणार, यापूर्वी दिला 2139% परतावा - Marathi News Gratuity Calculator | पगारदारांनो, ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी 'या' सूत्राचा वापर करा, रक्कम सहज समजेल - Marathi News Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर, श्रीमंत करणार हा पेनी शेअर, कंपनीचा संरक्षण क्षेत्रातही प्रवेश - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | हीच मोठी संधी! पेनी शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक पुन्हा तेजीने परतावा देणार - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share Price – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • ब्रोकरेज फर्म नोमुरा – BUY रेटिंग
  • स्टॉक रेटिंग ‘Neutral’ वरून अपग्रेड
  • ब्रोकरेज सिटीफर्म – BUY रेटिंग
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर, गुरुवारी या कंपनीच्या (NSE: VodafoneIdea) शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक किंचित तेजीत आला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

ब्रोकरेज फर्म नोमुरा – BUY रेटिंग
जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर 20 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.35 टक्के वाढीसह 10.52 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

स्टॉक रेटिंग ‘Neutral’ वरून अपग्रेड
नोमुरा फर्मने ने Vodafone Idea स्टॉकची रेटिंग ‘Neutral’ वरून अपग्रेड करून ‘Buy’ अशी केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 15 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सरकारी सहाय्य मिळाल्यास व्होडाफोन आयडिया कंपनीची भांडवलाची कमतरता पूर्ण होऊ शकते. तसेच Vodafone Idea कंपनीकडून 12 टक्के ARPU वाढ आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ग्राहकांच्या तोट्याचा कल सुधारण्याची शक्यता आहे. 2024-27 दरम्यान व्होडाफोन आयडिया कंपनीचा EBITDA 15 टक्के राहू शकतो.

ब्रोकरेज सिटीफर्म – BUY रेटिंग
तेजीच्या काळात व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ग्लोबल ब्रोकरेज सिटीने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर 22 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणी याचिका फेटाळली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीला एजीआर थकबाकीची पुनर्गणना करायची होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या कामाला स्पष्ट नकार दिला आहे. याचा अर्थ व्होडाफोन आयडिया कंपनीला संपूर्ण थकबाकी भरावी लागणार आहे. या क्युरेटिव्ह याचिकांमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने दावा केला आहे को, एजीआर थकबाकी ठरवण्यात चुका झाल्या आहेत, जी एकूण 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x