22 November 2024 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

IRFC Share Price | IRFC सहित या PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • IRFC Share PriceNSE: IRFCNSE: HUDCO
  • कर्ज वितरित करण्याची योजना
  • IRFC शेअर विक्रमी उच्चांक किमतीवरून 32% घसरला
  • या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी आणि हुडको या दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी (NSE: IRFC) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. हुडको कंपनीचे (NSE: HUDCO) शेअर्स एका दिवसात 9 टक्के वाढले होते. त्यापूर्वी सलग पाच दिवस हुडको स्टॉक एकूण दहा टक्के घसरला होता. हुडको कंपनीचे शेअर्स 353 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 35 टक्के घसरले आहेत.

कर्ज वितरित करण्याची योजना
तज्ञांच्या मते पुढील तीन ते चार वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत कंपनीने 1 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्याची योजना आखली आहे. या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर 2024 नंतर PMAY कर्ज वितरणाबाबत स्पष्टता आल्यावर हुडको कंपनी आपल्या वितरण लक्ष्यात सुधारणा करण्याची योजना आखत आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 9.15 टक्के वाढीसह 251.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

IRFC शेअर विक्रमी उच्चांक किमतीवरून 32% घसरला
आयआरएफसी कंपनीचे शेअर्स सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी 4 टक्के वाढले होते. त्यापूर्वी चार ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 7 टक्के घसरला होता. आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 32 टक्के घसरला आहे. HUDCO स्टॉक आपल्या 200 दिवसांच्या DEMA सपोर्ट झोनच्या खाली 225-230 रुपयेच्या आसपास स्थिरावला आहे. सलग 10 आठवड्यांच्या मंदीनंतर आयआरएफसी स्टॉक किंचित स्थिर झाला आहे.

या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट
आयआरएफसी स्टॉकने आपल्या 152 रुपये या 200-दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज किंमत पातळीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 4.21 टक्के वाढीसह 161.79 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी करताना 153 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉक 61 टक्के वाढला आहे. तर हुडको स्टॉक 2024 या वर्षात 93 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x