22 November 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

My EPF Money | EPFO UAN नंबर विसरला असाल तर काळजी करू नका, या पद्धतीने सहज मिळून जाईल - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • UAN नंबरमुळे मिळतात या सुविधा :
  • अशा पद्धतीने पुन्हा मिळवा UAN नंबर :
My EPF Money

My EPF Money | ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ EPFO मध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम चेक करण्यासाठी एक UAN नंबर दिला जातो. या नंबरमुळे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या पीएफच्या पैशांची सर्व व्यवस्थित माहिती घेऊ शकता. UAN नंबर 12 अंकाचा असून अनेक व्यक्तींना हा नंबर लक्षात ठेवण्यास जमत नाही. काही व्यक्ती हा नंबर विसरून जातात. त्यामुळे पीएफचे पैसे चेक करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला UAN नंबर कसा चेक करायचा याबद्दल सांगणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा नंबर पाहू शकता.

UAN नंबरमुळे मिळतात या सुविधा :
* युएएन नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या ईपीएफओ खात्यातील जमा, शिल्लक पडताळून पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला देखील पैशांच्या सर्व तरतुदीचा आढावा ठेवता येतो.
* युएएन नंबरमुळे तुम्ही तुमचं जुनं अकाउंट नवीन अकाउंटमध्ये अगदी सहजरीत्या ट्रान्सफर करू शकता. युएएन नंबरमुळे तुम्ही चांगल्या सुविधा अनुभवू शकता.
* जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर, UAN नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. या नंबरशिवाय तुम्ही अकाउंटमधून पैसे काढू शकत नाही.

अशा पद्धतीने पुन्हा मिळवा UAN नंबर :

* UAN नंबर पाहण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.

* पुढे ‘अवर सर्विस’ नावाचं ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

* पुढील प्रोसेसमध्ये फॉर एम्प्लॉईजवर जाऊन ऑनलाइन सर्विस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

* त्यानंतर समोर सांगितल्यानुसार तुमचा पीएफ आयडी आणि मोबाईल नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच गेट ऑथराईजेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

* गेट ऑथरायजेशन या ऑप्शनवर क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवर एक पिन पाठवण्यात येईल. पाठवलेला ओटीपी माहितीमध्ये भरूनच सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. ही सर्व प्रोसेस करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर लगेचच दिसेल.

Latest Marathi News | My EPF Money UAN Number 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x