22 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत नवीन अपडेट, मालामाल करणार हा स्टॉक, यापूर्वी दिला 2828% परतावा - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • शेअर्स स्टेज 1 ASM श्रेणीतून बाहेर – Suzlon Share
  • 5 वर्षात 2828% परतावा दिला – NSE:SUZLON
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3.22 टक्क्यांच्या वाढीसह 83.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्के वाढ झाली होती. याच ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक व्हॉल्यूम मजबूत वाढला होता, आणि एका दिवसात कंपनीचे 8.46 कोटी इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 82.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर्स स्टेज 1 ASM श्रेणीतून बाहेर
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये उलाढाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सेबीने कंपनीचे शेअर्स स्टेज 1 ASM श्रेणीतून बाहेर ठेवले आहेत. या स्टॉकमध्ये निर्माण होणाऱ्या तेजीमुळे, सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स रेग्युलेटरी मेकॅनिझम ASM स्टेज 1 अंतर्गत ठेवले होते. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 129 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.

5 वर्षात 2828% परतावा दिला
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,785.98 कोटी रुपये आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.6 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 129.7 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 116.3 टक्के वाढली आहे. मागील एक वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 221.5 टक्के, दोन वर्षात 949 टक्के, 3 वर्षात 1302 टक्के आणि 5 वर्षात 2828 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x