29 September 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Spa Cream For Straight Hair | घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, हव्या केवळ 3 गोष्टी, केस होतील कायमचे सरळ - Marathi News Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | VI कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 10 रुपयाचा शेअर पुन्हा मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: VodafoneIdea – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • महत्त्वपूर्ण करार
  • 5G रोलआउटवर काम सुरु
  • शेअर्स 1 महिन्यात 30% घसरले
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 11.61 रुपये किमतीवर (NSE: VodafoneIdea) ट्रेड करत होते. तर आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी आणि 5G रोलआउटसाठी तीन वर्षांच्या कालावधीत दूरसंचार उपकरणे खरेदी करण्याचा 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30,000 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

महत्त्वपूर्ण करार
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल विरुद्ध बाजारपेठेतील स्पर्धात्मकता टिकून राहावी आणि ग्राहकांचे नुकसान टाळता यावे यासाठी हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 10.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या भांडवली खर्च कार्यक्रमाचे उद्दिष्ट 4G कव्हरेज 1.03 अब्जवरून वाढवून 1.2 अब्ज करणे आहे.

5G रोलआउटवर काम सुरु
या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट भारतीय बाजारपेठेत 5G सेवा लाँच करणे, आणि डेटा वाढीच्या अनुषंगाने क्षमता वाढवणे हे आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान भागीदार नोकिया आणि एरिक्सनसोबत काम करत आहे. यासह कंपनीने सॅमसंगला देखील नवीन भागीदार म्हणून जोडले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील तिमाहीत 4G नेटवर्क विस्तार आणि 5G रोलआउटवर काम करत आहे.

शेअर्स 1 महिन्यात 30% घसरले
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणात व्होडाफोन आयडिया कंपनीची याचिका फेटाळल्यानंतर आणि एजीआर मागणीची संपूर्ण रक्कम कायम ठेवल्यानंतर शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 24 टक्क्यांनी घसरला होता. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 15 टक्के घसरला होता. गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 30 टक्के घसरले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x