22 November 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

TATA Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News

Highlights:

  • TATA Steel Share PriceNSE: TATASTEEL – टाटा स्टील कंपनी अंश
  • मॅक्वेरी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • कंपनीकडून 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणूक
TATA Steel Share Price

TATA Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स (NSE: TATASTEEL) खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 153.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (टाटा स्टील कंपनी अंश)

18 जून रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 184.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 114.25 रुपये होती. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 161.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 171 रुपये किमतीवर जाऊ शकतात. टाटा स्टील कंपनीने त्यांच्या कलिंगनगर स्टील प्लांटमध्ये भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुरू केली आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता वार्षिक 30 लाख टन वरून 80 लाख टन पर्यंत वाढली आहे.

ब्लास्ट फर्नेस हा एकात्मिक पोलाद उत्पादन संयंत्राचा एक प्रमुख घटक असतो, जो 1500 सेल्सिअस पर्यंत तापमानात गरम धातू तयार करतो. नोव्हेंबर 2018 मध्ये टाटा स्टील कंपनीने ओडिशातील कलिंगनगर प्लांटच्या विस्तारासाठी 27000 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. टाटा स्टील कंपनीने ओडिशा राज्यातील भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे.

कंपनीकडून 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणूक
मागील 10 वर्षांत टाटा स्टील कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी एकूण 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. टाटा स्टील कंपनीने तयार केलेली 5,870 घनमीटर क्षमता असलेली लोह पोलाद भट्टी पर्यावरणपूरक डिझाइनसह सुसज्ज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x