29 September 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
iPhone 16 | अवघे 2497 रुपये भरून घरी आणा iPhone 16, दोन वर्ष EMI वर व्याज नाही, दमदार ऑफर्स - Marathi News Home Loan EMI | गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी अलर्ट, अन्यथा 50 लाखांच्या कर्जावर अधिकचे 25 लाख रुपये भरावे लागतील, ही चूक टाळा Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ब्रेकआउट देणार, स्टॉक रेटिंग 'अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Axis Mutual Fund | बँक FD नव्हे, या म्युच्युअल फंड योजना वर्षाला 30 ते 40 टक्के परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News
x

My EPF Money | नोकरदारांसाठी अपडेट, 21 हजाराच्या पगारावर व्याजाच्या 85 लाख रुपयांसह 1 कोटी रुपये मिळणार - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन भागांचे होते योगदान :
  • पहा कॅल्क्युलेशन :
  • लवकरच वाढणार 21,000 हजारांपर्यंत वेतन :
  • 35 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या योगदानाचे कॅल्क्युलेशन :
  • मर्यादेमध्ये केलेला हा बदल जाणून घ्या :
My EPF Money

My EPF Money | मीडिया रिपोर्टनुसार लवकरच सरकार नोकरदारांसाठीचा एक मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे अनेक पगारदारांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) आणि कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (ईपीएस) मध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. हा निर्णय पक्का झाल्यानंतर प्रत्येक कर्मचारी कोट्याधीश होऊ शकतो. नुकतच याबाबत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी या होणाऱ्या बदलावर काही संकेत दिले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन भागांचे होते योगदान :

होणारे फेर बदल लक्षात घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. आता समजा एखादा कर्मचारी 15,000 पगाराच्या दृष्टीने कंपनीमध्ये काम करत असेल तर, ईपीएफओ कर्मचाऱ्याच्या खात्यात त्याच्या पगाराच्या हिशोबाने दोन भागांमध्ये योगदान केले जाते. दोन भाग म्हणजेच 3.67% एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात म्हणजेच भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो. तर, दुसरा भाग 8.33% एवढी रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) मध्ये जमा केला जातो.

पहा कॅल्क्युलेशन :

या सर्व गोष्टींचा विचार करून कॅल्क्युलेशन काढले तर, 15,000 हजाराच्या पगारावरून 1,800 रुपये भविष्य निर्वाह निधीमध्ये तर, नियोक्ताकडून 500.50 रुपये खात्यामध्ये जमा केले जाते. या हिशोबाने पेन्शनची एकूण रक्कम 1,249.50 एवढी रक्कम जमा होईल.

लवकरच वाढणार 21,000 हजारांपर्यंत वेतन :
21,000 रुपयांच्या हिशोबाचा प्रस्ताव मंजूर झाल्याबरोबर कर्मचाऱ्याला 21,000 पगार देण्यात येईल. आता या पगारातील कर्मचाऱ्याकडून होणारे एकूण योगदान 2,520 रूपये असेल तर, 770.70 रुपये हे योगदान नियोक्ताकडून होणारे असेल. त्यांनतर EPS खात्यात 1,749.30 रुपये जमा होतील.

35 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या योगदानाचे कॅल्क्युलेशन :

समजा सरकारने पगाराची मर्यादा 21,000 रुपये केली तर, एकूण 35 वर्ष कामाचे योगदान देणारा 23 वर्षीय तरुण 1 कोटींची रक्कम जमा करू शकतो. सध्याच्या 15 हजारांच्या मर्यादेवर 71.55 लाख रुपये एवढी रक्कम जमा होते. यामधील योगदानाची एकूण रक्कम 10.71 तर, व्याजाची 60.84 लाख रुपये एवढी रक्कम जमा होते. अगदी त्याचप्रमाणे 21 हजाराच्या पगारावर एकूण 15 लाखांचे योगदान तर व्याजाची रक्कम 85 लाख रुपये एवढी होते. याचाच अर्थ तुम्हाला जास्तीचे 28.45 लाख रुपये मिळतात.

मर्यादेमध्ये केलेला हा बदल जाणून घ्या :

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनने आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आधी ही मर्यादा 50,000 रुपये एवढीच होती. परंतु आता तुम्ही 1 लाखांपर्यंत रक्कम काढून घेऊ शकता. ही रक्कम तुम्ही कुटुंबावर आलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये काढून घेऊ शकता.

Latest Marathi News | My EPF Money Fund 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x