22 November 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Motors Share PriceNSE: TATAMOTORS – टाटा मोटर्स कंपनी अंश
  • टाटा मोटर्सचे दोन नवीन मॉडेल्स लॉन्च
  • टाटा मोटर्स शेअर टेक्निकल चार्टवर
  • LKP सिक्युरिटीज फर्म  – BUY रेटिंग
Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीचे (NSE: TATAMOTORS) शेअर्स 10.53 टक्के घसरले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 977.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स इंडेक्समध्ये 17.49 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

टाटा मोटर्सचे दोन नवीन मॉडेल्स लॉन्च
टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपल्या नेक्सन कारच्या दोन नवीन मॉडेल्स लॉन्च केले आहेत. CNG मॉडेलची किंमत 8.99 लाख रुपये आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. नेक्सन ही भारतातील एकमेव कार आहे जी पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 961.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स शेअर टेक्निकल चार्टवर
टेक्निकल चार्टवर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने 950-940 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 984-1,036 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एंजल वन फर्मच्या तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स स्टॉक 1,179.05 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून खाली आला आहे. या स्टॉकने 1011-1032 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

LKP सिक्युरिटीज फर्म  – BUY रेटिंग
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, जोपर्यंत हा स्टॉक 950 रुपये किमतीच्या वर राहील, तोपर्यंत त्यात रिकव्हरीचे संकेत मिळतील. पुढील काळात हा स्टॉक 1,015 रुपये किमतीवर जाऊ शकतो. दैनंदिन चार्टवर टाटा मोटर्स स्टॉकने 949 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. सध्या या स्टॉकला 984 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 984 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 1,036 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 1 सप्टेंबर 2024 पर्यंत, प्रवर्तकानी टाटा मोटर्स कंपनीचे 41.86 टक्के भागभांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x