22 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी बाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: VODAFONEIDEA – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • 5G सेवा लाँच करण्याचे उद्दिष्ट
  • “क्विक विन” कॅपेक्स उपक्रम सुरू
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग यासारख्या दिग्गज कंपन्यासोबत पुढील 3 वर्षांत नेटवर्क उपकरणांच्या (NSE: VODAFONEIDEA) पुरवठ्यासाठी 3.6 अब्ज डॉलर्सचा करार करणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी ही माहिती येताच व्होडाफोन आयडिया स्टॉक 8 टक्के वाढीसह 11.42 रुपये किमतीवर पोहचला होता. हा करार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या तीन वर्षांच्या भांडवली खर्च योजनेतील पहिला टप्पा असेल. याचे एकूण मुल्य 6.6 अब्ज किंवा रुपये 550 अब्ज रुपये आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

5G सेवा लाँच करण्याचे उद्दिष्ट
व्होडाफोन आयडिया कंपनीचे लक्ष्य 4G कव्हरेज 1.03 अब्ज वरून 1.2 अब्ज लोकांपर्यंत वाढवणे आहे. तसेच कंपनीने भारतीय बाजारपेठेत 5G सेवा लाँच करण्याचे, आणि वाढती डेटा मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने Nokia आणि Ericsson सोबत भागीदारी करून सॅमसंग कंपनीला नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन पुरवठादार म्हणून सामील केले आहे. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.91 टक्के घसरणीसह 10.36 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

“क्विक विन” कॅपेक्स उपक्रम सुरू
व्होडाफोन आयडिया कंपनीने इक्विटीद्वारे 240 अब्ज रुपये भांडवल उभारणी केल्यानंतर आणि जून 2024 च्या लिलावात 35 अब्ज रुपये मूल्याचे स्पेक्ट्रम संपादन केल्यानंतर कंपनीने “क्विक विन” कॅपेक्स उपक्रम सुरू केला आहे. यमधे कंपनी विद्यमान साइट्समध्ये अधिक स्पेक्ट्रम जोडणे आणि नवीन टॉवर सेट करत आहे. यामुळे कंपनीच्या नेटवर्क क्षमतेत 15 टक्के वाढ होईल.

सप्टेंबर 2024 अखेरीपर्यंत कंपनीने अतिरिक्त 16 दशलक्ष ग्राहक जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. कंपनीने दीर्घकालीन कॅपेक्ससाठी 250 अब्ज रुपये भांडवल सुविधा आणि 100 अब्ज रुपये नॉन-फंड-आधारित सुविधा सुरक्षित करण्यासाठी विद्यमान आणि नवीन कर्जदारांशी चर्चा सुरू केली आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया कंपनीची एजीआर थकबाकीची अपील फेटाळल्यानंतर कंपनीचे शेअर्स लक्षणीय विक्री दबावात आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x