22 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Ration Card | 'ही' प्रोसेस पूर्ण करून केवळ 15 दिवसांत रेशन कार्डवर जोडलं जाईल कुटुंबातील नव्या सदस्याचं नाव - Marathi News

Highlights:

  • Ration Card
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे जोडू शकता नावं :
  • कुटुंबप्रमुखाच्या नावावर दिलं जातं रेशन कार्ड :
  • 3 नंबरचा फॉर्म भरावा लागेल :
  • रेशन कार्ड यायला 15 दिवस लागू शकतात :
Ration Card

Ration Card | रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य घेण्यासाठीच नाही तर, इतर कामकाजांसाठी देखील वापरला जातो. बऱ्याच कामांमध्ये तुमचं ओळखपत्र म्हणून रेशन कार्डच्या कागदाचा पुरावा देखील मागतात. त्याचबरोबर रेशन कार्डवर सामान्यांपासून ते गरीब प्रवर्गातील व्यक्तींना मोफत अन्नधान्य पुरवलं जातं.

आज या बातमीपत्रातून रेशन कार्डवर एखाद्या नव्या व्यक्तीचं नाव जोडण्यासाठी किती दिवसांचा काळ मोजावं लागतो, सोबतच कोणकोणत्या प्रकारे तुम्ही रेशन कार्डवर नव्या सदस्याच नाव जोडू शकता याबाबत आम्ही सांगणार आहोत. चला तर पाहूया.

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे जोडू शकता नावं :

रेशन कार्डवर एखाद्या नवीन सदस्याच नाव जोडायचं असेल तर, तुम्ही ते घरबसल्या देखील करू. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्हाला रेशन कार्डवर नाव जोडणी करता येणार आहे. तुमच्या कुटुंबात एखादं मुलं जन्माला आलं असेल तर, त्याच्या जन्म प्रमाणपत्राची गरज भासू शकते. अशातच एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल आणि राशन कार्डवर नाव जोडायचं असेल तर, लग्न झालेल्याचा पुरावा द्यावा लागेल. ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर काहींना अर्जासोबत आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र देखील जोडावं लागतं.

कुटुंबप्रमुखाच्या नावावर दिलं जातं रेशन कार्ड :

कोणत्याही व्यक्तीच्या रेशन कार्डवर कुटुंबातील मोठ्या सदस्याचं म्हणजेच कुटुंबप्रमुखाचं नाव सर्वात पहिले असतं. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची नावं जोडण्यात येतात. कुटुंबामध्ये नवीन सदस्य आल्यास किंवा नवीन मुलाचा जन्म झाल्यास त्याचं नाव कार्डावर जोडलं जातं. लग्न करून आलेल्या नव्या महिलेचं नाव देखील रेशन कार्डवर जोडण्यात येत.

3 नंबरचा फॉर्म भरावा लागेल :

रेशन कार्डवर नवीन नाव जोडणीसाठी तुम्हाला 3 नंबरचा फॉर्म भरून द्यावा लागेल. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकता. त्यासाठी तुम्हाला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म 3 भरावा लागेल. हा फॉर्म ऑनलाईन भरता येत नसेल तर, तुम्ही तुमच्या घराजवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन फॉर्म भरून देऊ शकता.

रेशन कार्ड यायला 15 दिवस लागू शकतात :

अगदी साधी सोपी प्रोसेस फॉलो करून झाल्यानंतर तुमचं रेशन कार्ड येण्यासाठी केवळ 15 ते 30 दिवस लागू शकतात. कारण की, रेशन कार्डवर नवीन नाव जोडणीसाठी भरून दिलेल्या अर्जासह तुमच्या संपूर्ण कागदपत्रांची व्यवस्थित पाहणी करावी लागते. या सर्व प्रोसेसला देखील थोडा फार वेळ लागतो आणि म्हणून नवीन रेशन कार्ड येण्यासाठी 15 ते 30 लागू शकतात.

Latest Marathi News | Ration Card Status 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Ration Card(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x