24 November 2024 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Smart Investment | शिक्षण, लग्न सर्व खर्चाची चिंता मिटली, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खास ठरतील या 3 योजना - Marathi News

Highlights:

  • Smart Investment
  • 1) एनपीएस वात्सल्य योजना :
  • 2) सुकन्या समृद्धी योजना :
  • 3) पीपीएफ योजना :
Smart Investment

Smart Investment | आपल्या देशातील मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. सोबतच त्यांनी उच्चशिक्षित होऊन चांगल्या नोकरीला लागावं, एवढेच नाही तर भविष्यात त्यांना कोणत्याही गोष्टीची चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकार अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहेत.

आतापर्यंत अनेक पालकांनी तसेच मुलांनी एनपीएस वात्सल्य योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ योजना यांसारखा योजनांचा आधार घेऊन स्वतःचं आयुष्य सुखमय बनवलं आहे. आज आम्ही तुम्हाला या तीन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या तिन्हीही योजनांचं एकंदरीत स्वरूप.

1) एनपीएस वात्सल्य योजना :
एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी बक्कळ पैशांची सोय करून ठेवू शकता. या पैशांतून तुमच्या मुलांचे त्याचबरोबर लग्नकार्य देखील पार पडू शकते. म्हणजेच तुम्ही तब्बल 11 कोटी रुपयांचा फंड जमा करून ठेवू शकता. या योजनेचा भाग होण्यासाठी भारतीय नागरिक असणे अत्यंत गरजेचे आहे. ही योजना सुरू करण्यासाठी तुम्ही केवळ एक हजार रुपये भरून गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये अशी देखील सुविधा आहे की, तुमचं मूल 18 वर्षाचं पूर्ण झालं तर तो हे अकाउंट स्वतःहून चालवू शकतो. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20% रक्कम काढून घेऊन 80% रकमेसह तुम्ही ॲन्यूइटी खरेदी करता येऊ शकते. या ॲन्यूइटीची खास गोष्ट म्हणजे तुमचा मुलगा त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन प्राप्त करू शकतो.

समजा या योजनेमध्ये तुम्ही 18 वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि या गुंतवणुकीवर तुम्हाला 10% ने परतावा मिळाला तर, तुमच्या खात्यात एकूण 5,00,000 रुपयांएवढी रक्कम जमा होईल. ही रक्कम न काढता तुमच्या मुलाने त्याच्या 60 व्या वर्षापर्यंत तशीच ठेवली आणि 10% व्याजाचे जमा होत राहिले तर, एकूण 2.75 कोटी रुपये जमा होतील. परतफेडीचा दर म्हणजेचं व्याजाचे दर 11.59 किंवा 12.86 टक्क्यांपर्यंत वाढले तर, व्याजदरानुसार 60 वर्षांपर्यंत खात्यामध्ये 5.97 आणि 11.05 करोड रुपयांचा फंड जमा करता येईल.

2) सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये देखील तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो. यामध्ये तुम्ही दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून मोठा फंड जमा करू शकता. योजनेमध्ये सध्या वार्षिक दरानुसार 8.2% व्याजदर मिळत आहे. व्याजदरानुसार दीड लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्ही केवळ 15 वर्षांमध्ये 22.50 लाख रुपयांएवढी रक्कम जमा करू शकता. याचाच अर्थ परताव्याच्या चालू व्याजदरानुसार मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात तब्बल 69.27 लाख रुपये जमा होतील.

3) पीपीएफ योजना :
पीपीएफ योजना ही एक सरकारी आणि अल्पबचत योजना असून बांधकामार्फत किंवा पोस्ट ऑफिसमार्फत चालवण्यात येते. अनेक व्यक्ती या योजनेचा लाभ घेतात. या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक आपलं खातं उघडू शकतो. त्याचबरोबर तुम्ही या योजनेमध्ये वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. या योजनेची कमीत कमी लिमिट केवळ 500 रुपयापर्यंत ठेवली आहे. योजनेची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेच्या 15 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडनंतर आणखीन दोनवेळा 5-5 वर्षांसाठी योजना एक्सटेंड करू शकता.

त्याचबरोबर या योजनेची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षाला 7.1% व्याजाने व्याजदर दिले जाते. एक्सटेंड रुलनुसार तुम्ही एका वर्षात लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, येत्या 25 वर्षांमध्ये ही रक्कम. 1.03 कोटींचा आकडा गाठेल.

Latest Marathi News | Smart Investment 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x